Facebook युजर्सना घरबसल्या पैसे कमवण्याची संधी, जाणून घ्या कसं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 11:01 AM2019-06-13T11:01:30+5:302019-06-13T11:05:53+5:30

फेसबुक युजर्ससाठी आता एक खूशखबर आहे कारण फेसबुकने युजर्सना घरबसल्या पैसे कमवण्याची संधी दिली आहे.

facebook will pay users for tracking their phone | Facebook युजर्सना घरबसल्या पैसे कमवण्याची संधी, जाणून घ्या कसं

Facebook युजर्सना घरबसल्या पैसे कमवण्याची संधी, जाणून घ्या कसं

googlenewsNext
ठळक मुद्देफेसबुक युजर्ससाठी आता एक खूशखबर आहे कारण फेसबुकने युजर्सना घरबसल्या पैसे कमवण्याची संधी दिली आहे. 'स्टडी' असं या रिसर्च अ‍ॅपचं नाव असून फेसबुकने मंगळवारी (12 जून) याबाबत घोषणा केली.अ‍ॅप युजर्सच्या फोनला ट्रॅक करुन कोण कोणते अ‍ॅप किती वेळ वापरतो याची माहिती संकलित करणार आहे.

नवी दिल्ली - सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म फेसबुक आपल्या युजर्ससाठी नवनवीन अपडेट आणत असतं. अनेक जण फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधत असतात. फेसबुक युजर्ससाठी आता एक खूशखबर आहे कारण फेसबुकने युजर्सना घरबसल्या पैसे कमवण्याची संधी दिली आहे. मात्र यासाठी युजर्सना एक अ‍ॅप डाऊनलोड करावं लागणार आहे. फेसबुकने एक नवं रिसर्च अ‍ॅप आणलं आहे.

'स्टडी' असं या रिसर्च अ‍ॅपचं नाव असून फेसबुकने मंगळवारी (12 जून) याबाबत घोषणा केली. हे अ‍ॅप युजरचा फोन ट्रॅक करणार आहे.  अ‍ॅप डाऊनलोड करताना युजर्सला त्यांच्या फोनमधील विविध अ‍ॅपचा ते किती वापर करता याची माहिती गोळा करण्याची परवानगी संबंधित रिसर्च अ‍ॅपला द्यावी लागणार आहे. यानंतर हे अ‍ॅप युजर्सच्या फोनला ट्रॅक करुन कोण कोणते अ‍ॅप किती वेळ वापरतो याची माहिती संकलित करणार आहे. फोन ट्रॅक करण्याची परवानगी देणाऱ्या युजर्सना फेसबुक पैसे देणार आहे. मात्र संबंधित अ‍ॅप केवळ 18 वर्षांपेक्षा  जास्त वय असलेले युजर्सच डाऊनलोड करू शकतात.

Study by Facebook नावाचं हे अ‍ॅप फोनमध्ये इन्स्टॉल केल्यानंतर युजर्सद्वारे वापरण्यात येणाऱ्या फीचर, विविध अ‍ॅपवर खर्च केलेला वेळ, देश, डिव्हाईस आणि नेटवर्कच्या प्रकाराची माहिती संकलित केली जाणार आहे. मार्केट रिसर्चमधून युजर्सच्या आवडीनिवडीची माहिती मिळणार आहे. त्याद्वारे युजर्सला त्यांना आवडणाऱ्या गोष्टी उपलब्ध करुन देता येतील, असा दावा फेसबुकने केला आहे.

facebook will now prioritise your close friends on your news feed | Facebook वर नवीन फीचर येणार, फेव्हरेट फ्रेंड टॉपवर राहणार

फेसबुकच्या सुरक्षिततेवर गेल्या काही महिन्यांपासून प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. फेसबुकने दिलेल्या माहितीनुसार, हे अ‍ॅप युजर्सला केवळ इन्स्टॉल होण्याआधीचीच नाही तर इन्स्टॉल केल्यानंतरही या प्रोग्राम अंतर्गत जाणाऱ्या डाटाची माहिती देणार आहे. या प्रोग्रामसाठी युजर्सची कमीत कमी माहिती घेतली जाईल. तसेच अ‍ॅपमधील मजकुराचा कोणतीही माहिती गोळा केली जाणार नाही. हा प्रोग्राम जॉईन केल्यावर अ‍ॅप डाऊनलोड करणाऱ्या युजर्सला किती पैसे मिळणार याची कोणतीही अधिकृत माहिती फेसबुककडून देण्यात आलेली नाही. मात्र, गेल्या वेळी अशाच प्रकारची योजना आणली तेव्हा फेसबुकने युजर्सला दर महिना 20 डॉलर दिले होते.

फेसबुकचे हे अ‍ॅप सुरुवातीच्या टप्प्यात अमेरिका आणि भारतात सुरू होणार आहे. फेसबुक या अ‍ॅपचे प्रमोशन करण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचाही उपयोग करणार आहे. जाहिरात पाहून जे युजर्स या प्रोग्रामध्ये सहभागी होतील त्यांना अ‍ॅपवर साईनअप करावे लागणार आहे. युजर्सची योग्यता तपासल्यानंतर फेसबुक हे अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी इन्वाईट करणार आहे.

facebook uploaded email contacts of almost 15 lakh user | फेसबुकचा पुन्हा

Facebook वर नवीन फीचर येणार, फेव्हरेट फ्रेंड टॉपवर राहणार

सोशल मीडिया फेसबुक आपल्या 2 अब्ज 30 कोटी युजर्ससाठी न्यूज फीडमध्ये काही फेरबदल करणार आहे. या बदलानंतर लवकरच युजर्सना त्यांचे खास मित्र-मैत्रिणी त्यांच्या फीडमध्ये टॉपवर दिसणार आहेत. फेसबुकने यासाठी अनेक पोस्टचं सर्वेक्षण केलं आहे. युजर्सना नेमकं काय पाहायला आवडतं. याचा रिसर्च केला. फेसबुकने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये सर्वेक्षणाच्या आधारे दोन रँकींग अपडेट करण्याची घोषणा केली आहे. युजर्सच्या आवडीच्या व्यक्तींना यामध्ये प्राधान्य देण्यात आलं असून फेसबुकवर ते टॉपमध्ये दिसणार आहेत. जर एका फोटोमध्ये टॅग केलं जात असेल तर किंवा एखाद्या पोस्टवर कमेंट येत असेल तर फेसबुक पॅटर्न दिसणार आहे. या सर्व गोष्टींचा वापर हा अल्गोरिदम ठरवण्यासाठी केला जाणार आहे. 

फेसबुकचा लूक लवकरच बदलणार; मार्क झुकेरबर्गने रिलीज केलं नवं डिझाईन

फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गने फेसबुक डेव्हलपर्स कॉन्फरन्समध्ये फेसबुकच्या नव्या डिझाईनची घोषणा केली आहे. फेसबुकने या नव्या डिझाईनमध्ये लाँच केल्यापासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील सिग्नेचर ब्लू बॅनर रिमूव्ह करण्यात आला आहे. कंपनीच्या नव्या डिझाईनमध्ये मेसेजिंग अ‍ॅप, ऑनलाईन मार्केट प्लेस आणि व्हिडीओ ऑन डिमांड हे एका बाजूला देण्यात आले आहेत. नवं फीचर युजर्ससाठी प्रायवेट फीड उपलब्ध करण्यासाठी डिझाईन करण्यात आल्याची माहिती  फेसबुकने दिली आहे. फेसबुकच्या नव्या डिझाईनमध्ये युजर्सच्या प्रायव्हसीवर फोकस करण्यात आलं आहे. हे डिझाईन प्रायव्हेट आणि इनक्रिप्टेड म्हणजेच सुरक्षितेसाठी तयार करण्यात आलं आहे. यामुळे कम्युनिकेशन हे जास्त सुरक्षित होणार आहे.

 

Web Title: facebook will pay users for tracking their phone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.