आता तुम्ही बोटांनी नव्हे, डोक्याने टायपिंग करणार, फेसबुक नवं तंत्रज्ञान आणणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 03:46 PM2019-07-31T15:46:52+5:302019-07-31T15:48:30+5:30

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक आता एक ब्रेन कम्प्यूटर ऑगमेंटेड रियलिटी (एआर) इंटरफेस डिव्हाईस विकसित करत आहे.

facebook is working on a device which will let users type with mind | आता तुम्ही बोटांनी नव्हे, डोक्याने टायपिंग करणार, फेसबुक नवं तंत्रज्ञान आणणार

आता तुम्ही बोटांनी नव्हे, डोक्याने टायपिंग करणार, फेसबुक नवं तंत्रज्ञान आणणार

Next
ठळक मुद्देसोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक आता एक ब्रेन कम्प्यूटर ऑगमेंटेड रियलिटी (एआर) इंटरफेस डिव्हाईस विकसित करत आहे. डिव्हाईसच्या मदतीने युजर्स बोटांनी नव्हे तर डोक्याने टायपिंग करू शकणार आहेत.ब्रेन अ‍ॅक्टिव्हिटी वाचून रियल टाईममध्ये ते स्पीचमध्ये बदलण्यात येणार आहे.

नवी दिल्ली - फेसबुक हे लोकप्रिय मेसेंजिंग अ‍ॅप असून त्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक आता एक ब्रेन कम्प्यूटर ऑगमेंटेड रियलिटी (एआर) इंटरफेस डिव्हाईस विकसित करत आहे. या डिव्हाईसच्या मदतीने युजर्स बोटांनी नव्हे तर डोक्याने टायपिंग करू शकणार आहेत. फेसबुकने F8 डेव्हलपर्स कॉन्फरन्स 2017 मध्ये ब्रेन कम्प्यूटर इंटरफेस (बीसीआय) प्रोग्रामची घोषणा केली होती. या प्रोग्रामच्या मदतीने एक छोटं डिव्हाईस तयार करण्यात येणार आहे. यामध्ये युजर्स विचार करून अगदी सहजपणे टाईप करू शकणार आहेत. 

युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, सॅन फ्रान्सिस्को (UCSF) येथील एका रिसर्च टीमची यासाठी फेसबुक मदत घेत आहे. बोलण्यासाठी असमर्थ असणाऱ्या लोकांना या डिव्हाईसचा अत्यंत फायदा होणार आहे. ब्रेन अ‍ॅक्टिव्हिटी वाचून रियल टाईममध्ये ते स्पीचमध्ये बदलण्यात येणार आहे. फेसबुकने मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, नेचर कम्युनिकेशन्स जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका पेपरमध्ये यूसीएसएफच्या टीमने याबाबत माहिती दिली आहे. 

सध्या हे डिव्हाईस फक्त काही शब्द आणि वाक्यच ओळखू शकणार आहे. मात्र लवकरच टान्सलेशनवर फोकस करून एक मोठा शब्दकोश तयार करण्यात येणार असल्याची माहिती  रिसर्चर्सने दिली आहे. एआरच्या मदतीने जगभरातील लोकांशी कनेक्ट होता येणार आहे. तसेच फोन अथवा लॅपटॉप ऑन न करता युजर्स आय कॉन्टॅक्टच्या मदतीने महत्त्वाच्या गोष्टी डिव्हाईसवर टाईप तसेच सेव्ह करू शकणार असल्याची माहिती फेसबुकने दिली आहे. एका हिंदी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

this is how you can create friends lists on facebook and how it will benefit you | चॅटिंगची गंमत वाढवणारं फेसबुकचं

Facebook मेसेंजरवरून हटवले जाणार 'हे' इंट्रेस्टिंग फीचर

फेसबुकने काही दिवसांपूर्वीच आपल्या डेव्हलपर कॉन्फरन्समध्ये मेसेंजर अ‍ॅप पहिल्यापेक्षा अधिक चांगलं आणि जलद करण्यासाठी योग्य ते बदल करणार असल्याची घोषणा केली आहे. फेसबुक आता आपल्या मेसेंजर प्लॅटफॉर्मवरून काही फीचर कमी करणार आहे. तसेच फेसबुक लवकरच आपल्या मेसेंजरवरून इन्स्टंट गेमिंग (Instant Game) फीचर हटवणार असल्याची माहिती मिळत आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, इन्स्टंट गेम्स हे मेसेंजरवरून हटवण्यात येणार असून ते फेसबुकच्या मेन अ‍ॅपमध्ये शिफ्ट करण्यात येतील. मेसेंजरमध्ये सध्या युजर्ससाठी लूडो क्लब, बास्केटबॉल, वर्ड्स विद फ्रेंड्स फ्रेंजी, Pac-Man आणि स्पेस इंवेडर्स सारखे इंट्रेस्टिंग गेम उपलब्ध आहेत. यामुळे युजर्स आपल्या फ्रेंड्ससोबत चॅटींग आणि गेमिंगची मजा अनुभवत होते. मात्र मेसेंजर अ‍ॅप अधिक जलद करण्यासाठी इन्स्टंट गेमिंग (Instant Game) फीचर हटवण्यात येणार असल्याचं फेसबुकने म्हटलं आहे.

facebook will now prioritise your close friends on your news feed | Facebook वर नवीन फीचर येणार, फेव्हरेट फ्रेंड टॉपवर राहणार

चॅटिंगची गंमत वाढवणारं फेसबुकचं 'हे' फीचर माहीत आहे का?

फेसबुकवर अनेक फीचर आहेत मात्र फारच कमी युजर्सना याची माहिती आहे. फेसबुकवर फ्रेंड्स लिस्ट नावाचं एक फीचर असून या फीचरच्या मदतीने युजर्स आपल्याला हवी तशी नवी फ्रेंड लिस्ट तयार करू शकतात. फेसबुकवर वेगवेगळी फ्रेंड लिस्ट तयार करण्याचा पर्याय मिळते असल्याने हे फीचर युजर्ससाठी फायदेशीर आहे. युजर्सना त्यांच्या आवडीची फ्रेंड लिस्ट तयार करता येणार असल्याने चॅटिंगची गंमत वाढवणार आहे. नव्या फिचरमुळे युजर्सना आपल्या पोस्ट फ्रेंड लिस्टप्रमाणे योग्य आणि आपल्याला हव्या असलेल्या लोकांसोबत शेअर करता येतील.   

Facebook युजर्सना घरबसल्या पैसे कमवण्याची संधी, जाणून घ्या कसं

फेसबुकने युजर्सना घरबसल्या पैसे कमवण्याची संधी दिली आहे. मात्र यासाठी युजर्सना एक अ‍ॅप डाऊनलोड करावं लागणार आहे. फेसबुकने एक नवं रिसर्च अ‍ॅप आणलं आहे. 'स्टडी' असं या रिसर्च अ‍ॅपचं नाव असून फेसबुकने मंगळवारी (12 जून) याबाबत घोषणा केली. हे अ‍ॅप युजरचा फोन ट्रॅक करणार आहे. अ‍ॅप डाऊनलोड करताना युजर्सला त्यांच्या फोनमधील विविध अ‍ॅपचा ते किती वापर करता याची माहिती गोळा करण्याची परवानगी संबंधित रिसर्च अ‍ॅपला द्यावी लागणार आहे. यानंतर हे अ‍ॅप युजर्सच्या फोनला ट्रॅक करुन कोण कोणते अ‍ॅप किती वेळ वापरतो याची माहिती संकलित करणार आहे. फोन ट्रॅक करण्याची परवानगी देणाऱ्या युजर्सना फेसबुक पैसे देणार आहे. मात्र संबंधित अ‍ॅप केवळ 18 वर्षांपेक्षा  जास्त वय असलेले युजर्सच डाऊनलोड करू शकतात.

 

Web Title: facebook is working on a device which will let users type with mind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.