लय भारी! सिंगल कॅमेरा फोनवरून Facebook वर अपलोड करता येणार 3D फोटो 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2020 01:37 PM2020-03-02T13:37:29+5:302020-03-02T13:42:08+5:30

सिंगल कॅमेरा फोनवरून आता फेसबुकवर 3D फोटो अपलोड करता येणार आहे.

Facebook’s 3D photos can now be made using single-camera phones SSS | लय भारी! सिंगल कॅमेरा फोनवरून Facebook वर अपलोड करता येणार 3D फोटो 

लय भारी! सिंगल कॅमेरा फोनवरून Facebook वर अपलोड करता येणार 3D फोटो 

googlenewsNext
ठळक मुद्देसिंगल कॅमेरा फोनवरून आता फेसबुकवर 3D फोटो अपलोड करता येणार आहे. युजर्सना स्मार्टफोनमध्ये 3D सेल्फी देखील घेता येणार आहे. जुने फोटो देखील नव्या पद्धतीने या फीचरच्या मदतीने पाहता येणार.

नवी दिल्ली - फेसबुक हे संवाद साधण्याचं उत्तम माध्यम आहे. फेसबुक आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असतं. सिंगल कॅमेरा फोनवरून आता फेसबुकवर 3D फोटो अपलोड करता येणार आहे. त्यामुळे फेसबुकच्या 3D फोटो फीचरची मजा ही आता सिंगल कॅमेरा युजर्सना घेता येणार आहे. कंपनीने याबाबतची घोषणा केली आहे. ऑक्टोबर 2018 मध्ये  फेसबुकने ही फीचर रोलआऊट केलं होतं. ज्याच्या मदतीने ड्यूल कॅमेरा फोन असलेले युजर्स 3D फोटो अपलोड करू शकतात. मात्र आता सिंगल कॅमेरा युजर्सनाही ते करता येणार आहेत. 

फेसबुकने दिलेल्या माहितीनुसार, 'स्टेट ऑफ द आर्ट' मशीन लर्निंग तंत्रज्ञानाच्या मदतीने सिंगल कॅमरा असलेले अँड्रॉईड आणि iOS डिव्हाईसवर 3D फोटो फीचर इनेबल करता येणार आहे. तसेच युजर्सना स्मार्टफोनमध्ये 3D सेल्फी देखील घेता येणार आहे. जुने फोटो देखील नव्या पद्धतीने या फीचरच्या मदतीने पाहता येणार आहे. तसेच ते देखील कन्वर्ट करता येणार असल्याची माहिती फेसबुकने दिली आहे. फेसबुक 3D फोटो फीचरचा वापर करण्यासाठी iPhone 7 किंवा त्यानंतरचा iOS डिव्हाईस तसेच चांगला अँड्रॉईड डिव्हाईस युजर्सकडे असणं गरजेचं आहे. 

Sensational! After the break-up, the engineer posted objectionable photos of his girlfriend on Facebook | खळबळजनक! ब्रेक - अपनंतर इंजिनिअरने गर्लफ्रेंडचे

असा क्रिएट करा 3D फोटो 

- सर्वप्रथम तुमच्या डिव्हाईसमध्ये फेसबुक अ‍ॅप इन्स्टॉल असणं गरजेचं आहे. तसेच त्याचे लेटेस्ट व्हर्जन अपडेट करा.

- फेसबुक अ‍ॅपवरून नवीन पोस्ट क्रिएट करा.

- अँड्रॉईड डिव्हाईसवर More पर्यायावर दिसणाऱ्या तीन डॉटवर काम करा. त्यातील 3D फोटो ऑप्शन सिलेक्ट करा. 

- iOS वर 3D पोस्ट ऑप्शन स्क्रोल करून सिलेक्ट करा. 

- फोनची गॅलरी दिसेल. जो फोटो 3D मध्ये हवा आहे तो सिलेक्ट करा. 

- फेसबुक काही वेळात तो फोटो 3D फोटोमध्ये कन्वर्ट करेल. त्यानंतर प्रिव्ह्यू करून त्याचं कॅप्शन लिहू शकता.

- शेवटी पोस्टवर क्लिक करून 3D फोटो शेअर करता येईल. 

delete your browsing history on facebook follow these steps to manage settings | Facebook वरून डिलीट करा ब्राऊजिंग हिस्ट्री; कसं ते जाणून घ्या

वेगवेगळ्या साईटशी संबंधित अनेक जाहिराती या फेसबुकवर दाखवल्या जातात. त्या ऑफ करता येतात. फेसबुकवर नको असलेल्या जाहिराती ऑफ करण्यासाठी एक ऑप्शन देण्यात आला आहे. ज्याच्या मदतीने ब्राऊजिंग डेटा देखील क्लिअर करता येतो. फेसबुकने Clear History Tool युजर्सला दिलं आहे ज्याच्या मदतीने सोशल नेटवर्किंग साईटवर ब्राऊजिंग डेटा डिलीट करता येणार आहे. फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी हे नवं टूल सर्व युजर्ससाठी रोलआउट केल्याची माहिती एका ब्लॉग पोस्टमध्ये दिली आहे. सेटिंग मेन्यूमध्ये दिसणाऱ्या या ऑप्शनला ऑफ फेसबुक अ‍ॅक्टिव्हिटी हे नाव देण्यात आलं आहे. डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी फेसबुकने हे टूल दिलं आहे. याच्या मदतीने युजर्स आपला डेटा कोणत्या साईटसोबट शेअर करू शकतात किंवा हटवू शकतात हे सिलेक्ट करू शकतात. 

'या' बातम्या ही नक्की वाचा

Google Chrome चा वापर करता?, मग त्वरित करा 'हे' काम, अन्यथा...

TikTok ने आणलं दमदार फीचर, मुलांच्या करामतींवर आता पालकांची नजर

'Meena' मारणार युजर्सशी मनसोक्त गप्पा, गुगलने आणली भन्नाट 'चॅटबोट'

आता स्मार्टफोन राहणार थंडा थंडा कूल कूल, शाओमीचा नवा पंखा पॉवरफूल

 

Web Title: Facebook’s 3D photos can now be made using single-camera phones SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.