जबरदस्त! आता कॅश, कार्डला विसरा अन् फेस स्कॅनरने ट्रान्जेक्शन करा; ऑनलाईन फ्रॉडचंही नो टेन्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2021 04:23 PM2021-11-13T16:23:47+5:302021-11-13T16:27:39+5:30

Facial Recognition Payment : कॅश किंवा कार्डने पेमेंट करण्याची गरज नाही. कॅश, कार्डला विसरून आता फेस स्कॅनरने ट्रान्जेक्शन करता येणार आहे.

facial recognition payment in supermarket you can pay without your phone or credit card | जबरदस्त! आता कॅश, कार्डला विसरा अन् फेस स्कॅनरने ट्रान्जेक्शन करा; ऑनलाईन फ्रॉडचंही नो टेन्शन

जबरदस्त! आता कॅश, कार्डला विसरा अन् फेस स्कॅनरने ट्रान्जेक्शन करा; ऑनलाईन फ्रॉडचंही नो टेन्शन

googlenewsNext

नवी दिल्ली - एखाद्या ठिकाणी खरेदीला गेलो की तिथे पेमेंटसाठी हमखास कॅश अथवा कार्ड मागितलं जातं. सध्या डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, गुगल पे, पेटीएम यासारख्ये काही पर्याय हे उपलब्ध आहेत. पण तुम्हाला जर कोणी चेहऱ्याने आता पेमेंट करता येईल सांगितलं तर तुमचा विश्वासच बसणार नाही. पण हो हे खरं आहे. कॅश, कार्डला विसरून आता फेस स्कॅनरने ट्रान्जेक्शन करता येणार आहे. विशेष म्हणजे यामुळे ऑनलाईन फ्रॉडचंही टेन्शन राहणार नाही. या नव्या पेमेंट सिस्टमला फेशियल रिकोग्निशन (Facial Recognition Payment) म्हटलं जातं. हे बायोमेट्रिक वेरिफिकेशनवर आधारित आहे. यात ग्राहक आणि स्टोर सिस्टमदरम्यान कोणताही संपर्क होणार नाही. 

कॅश किंवा कार्डने पेमेंट करण्याची यामध्ये गरज नाही. पेमेंट करण्यासाठी एका खास प्रकारच्या कॅमेरासमोर उभं राहण्याची गरज आहे. या कॅमेरासमोर उभं राहून शॉपिंगचं पेमेंट होईल. बायोमेट्रिक वेरिफिकेशनमध्ये ज्याप्रमाणे तुमच्या बोटांचे ठसे किंवा स्कॅनिंग केलं जात, फेशियल रिकोग्निशनमध्येही असाच प्रकार असतो. इंडियन एक्सप्रेसच्या एका रिपोर्टनुसार, 2025 पर्यंत संपूर्ण जगभरात 1.4 अब्जाहून अधिक लोक फेशियल रिकोग्निशनद्वार पेमेंट करतील. हे सिस्टम अतिशय सुरक्षित असल्याचं बोललं जात असून याची मागणीही वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

संपर्कात न येता, चेहऱ्याच्या आधारे पेमेंट करण्यासाठी विजनलॅब्स नावाच्या नेदरलँड्समधील एका कंपनीने नुकतंच आपल्या बायोमेट्रिक पेमेंट हार्डवेअर - विजनलॅब्स लूना पीओएस टर्मिनल लाँचची घोषणा केली. हे पेमेंट सिस्टम स्मार्टफोन अनलॉक करण्यासाठी फेशियल रिकोग्निशनद्वारे ग्राहकच्या चेहऱ्याला स्कॅन करतं. काही सेकंदानंतर ग्राहकाच्या चेहऱ्याचं टेम्पलेट पेमेंट प्रोव्हायडर कंपनी किंवा बँकेकडे पाठवलं जातं. बँकेच्या सिस्टममधून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर पेमेंट केलं जातं. 

आधार कार्डमध्ये ज्याप्रमाणे फिंगर प्रिंट घेतलं जातं, त्याचप्रमाणे फेशियल रिकोग्निशनमध्ये चेहऱ्याचा आकार, नाकाचा आकार, डोळे अशा अनेक डिटेल्स फेशियल रिकोग्निशनमध्ये घेतले जातात आणि अशा सर्वांच्या मदतीने एक फेसप्रिंट तयार होतो. हा फेसप्रिंट बँक अकाउंटशी जोडला जातो. बँकेत ग्राहकाचा हा डेटा पेमेंट सिस्टम वेरिफाय करतो. यासाठी ग्राहकाला स्कॅनरसमोर उभं राहावं लागतं. या पेमेंट सिस्टममध्ये त्याच खात्यातून पैसे कट होतात, ज्याचं फेशियल रिकोग्निशन जोडलेलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: facial recognition payment in supermarket you can pay without your phone or credit card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.