जबरदस्त! 5 वर्षांच्या वॉरंटीसह आला Fairphone 4; फक्त नाव 'fair' आहे का?  

By सिद्धेश जाधव | Published: October 1, 2021 07:45 PM2021-10-01T19:45:45+5:302021-10-01T19:45:59+5:30

Fairphone 4 मध्ये स्नॅपड्रॅगन 750जी 5जी प्रोसेसर, 8GB रॅम आणि अँड्रॉइड 11 असे स्पेक्स मिळतात.  

Fairphone 4 sustainable smartphone price eur 579 launch with 48mp dual rear camera 8gb ram snapdragon 750g soc specifications sale details  | जबरदस्त! 5 वर्षांच्या वॉरंटीसह आला Fairphone 4; फक्त नाव 'fair' आहे का?  

जबरदस्त! 5 वर्षांच्या वॉरंटीसह आला Fairphone 4; फक्त नाव 'fair' आहे का?  

googlenewsNext

Fairphone 4 आज युरोपमध्ये सादर करण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या स्पेक्स आणि फीचर्सपेक्षा फोनच्या कंपनीची जास्त चर्चा आहे. कंपनीने केलेले दावे पाहता हा फोन खरंच Fair आहे असे वाटते. कंपनी ‘Ethical, Reliable आणि Sustainable’ असण्याचा दावा करते. प्रत्येक फोनच्या विक्री मागे तेवढ्याच वजनाचे इलेक्ट्रॉनिक वेस्ट कंपनी रिसायकल करते.  

हा फोन मॉड्युलर आहे त्यामुळे तुम्ही स्वतः यातील पार्टस बदलू शकता किंवा हा रिपेयर करू शकता. एकीकडे इतर कंपन्या शक्य होईल तितक्या प्रमाणात फोन दुरुस्त करता येऊ नये हे बघत असताना हा बदल नवीन आहे. तसेच ही कंपनी Fairphone 4 स्मार्टफोनवर 5 वर्षांची वॉरंटी देत आहे. परंतु या सर्व गोष्टींचा परिणाम किंमतीवर दिसून येत आहे. कंपनी प्रीमियम किंमतीत मिड रेंज स्पेक्स देत आहेत, चला जाणून घेऊया.  

Fairphone 4 ची किंमत  

Fairphone 4 दोन व्हेरिएंटमध्ये बाजारात आला आहे. या फोनचा 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट EUR 579 (जवळपास 49,800 रुपये) विकत घेता येईल. तर 8GB रॅम आणि 256GB व्हेरिएंटसाठी EUR 649 (जवळपास 55,845 रुपये) द्यावे लागतील.  

Fairphone 4 चे स्पेसिफिकेशन्स 

Fairphone 4 मध्ये 6.3-इंचाचा फुल एचडी+ IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ची सुरक्षा देण्यात आली आहे. हा फोन स्नॅपड्रॅगन 750जी 5जी प्रोसेसर आणि Adreno 619 जीपीयूला सपोर्ट करतो. या फोनमधील स्टोरेज मायक्रो एसडी कार्डच्या माध्यमातून 2 टीबी पर्यंत वाढवता येते. Android 11 सह येणाऱ्या या फोनला कंपनी दोन अँड्रॉइड अपडेट आणि 2025 पर्यंत सॉफ्टवेयर अपडेट देणार आहे.  

फोनमधील ड्युअल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 8x डिजिटल झूमसह 48MP चा Sony IMX582 प्रायमरी कॅमेरा आणि 48MP ची मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाईड-अँगल लेन्स मिळते. फोनमधील 25MP Sony IMX576 फ्रंट कॅमेरा देखील 8x डिजिटल झूमला सपोर्ट करतो. कनेक्टिविटीसाठी  Fairphone 4 मध्ये 5जी, 4जी एलटीई, ड्युअल बँड Wi-Fi 802.11 a/b/g/n/ac, ब्लूटूथ वी5.1, NFC, यूएसबी टाइप-सी पोर्ट, यूएसबी ओटीजी आणि डिस्प्ले पोर्ट मिळतात. हा फोन IP54 वॉटर आणि डस्ट रेजिस्टन्ससह सादर करण्यात आला आहे. फोनमधील 3,905mAh ची बॅटरी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.  

Web Title: Fairphone 4 sustainable smartphone price eur 579 launch with 48mp dual rear camera 8gb ram snapdragon 750g soc specifications sale details 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.