भन्नाट! बनावट नोट ओळखणार ‘हे’ अ‍ॅप्स, फसवणूक टाळण्यासाठी आत्ताच करा डाउनलोड 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 04:21 PM2022-05-30T16:21:52+5:302022-05-30T16:22:04+5:30

बनावट नोटांमुळे आपलं मोठं नुकसान होऊ शकतं आणि बऱ्याचदा अशा नोटा आपल्या डोळ्यांना धोका देतात.  

Fake Currency Note Identifying Apps For Android And iPhone  | भन्नाट! बनावट नोट ओळखणार ‘हे’ अ‍ॅप्स, फसवणूक टाळण्यासाठी आत्ताच करा डाउनलोड 

भन्नाट! बनावट नोट ओळखणार ‘हे’ अ‍ॅप्स, फसवणूक टाळण्यासाठी आत्ताच करा डाउनलोड 

Next

मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या पाच वर्षांमध्ये 500 रुपयांच्या बनावट चलनात येण्याचं प्रमाण 197 पटीनं वाढलं आहे. या नोटांमुळे आपलं मोठं नुकसान होतं. तसेच या नोटा खऱ्या खुऱ्या वाटतात त्यामुळे अशा नोटा ओळखणं कठीण होऊन बसतं. अशावेळी तुम्ही टेक्नॉलॉजीची मदत घेऊ शकता. जर तुम्ही जास्त रोकड बाळगत असाल किंवा कॅशमध्ये व्यवहार करत असाल तर पुढे दिलेले मोबाईल अ‍ॅप्स तुमची मदत करू शकतात.  

INR Fake Note Check Guide 

हे अ‍ॅप Android युजर्स Play Store वरून सहज डाउनलोड करू शकतात. हे एक गायडींग अ‍ॅप आहे. जे सामान्य नागरिकांना बनावट नोटांविषयी जागरूक करण्यासाठी बनवण्यात आलं आहे. नोटेचा फोटो अपलोड करताच ती असली आहे की नकली हे सांगितलं जातं, असा दावा डेव्हलपरनं केला आहे. बनावट आणि खऱ्या नोटांमधील फरकाची माहिती नोटिफिकेशन्सच्या माध्यमातून दिली जाते.  

Counterfeit Money Detector 

हे अ‍ॅप जगभरातील सर्व देशांच्या बनावट नोटा ओळखण्यासाठी बनवण्यात आलं आहे. त्यामुळे यात तुम्हाला तुमचा देश निवडावा लागेल. Playstore वरील या अ‍ॅपमधून तुम्हाला भारतासह जगभरातील अनेक देशांच्या नोटांची माहिती मिळेल. जर तुम्ही परकीय चलन हाताळत असाल तर हे अ‍ॅप तुम्ही नक्की डाउनलोड करू शकता.  

Chkfake App 

या अ‍ॅपमध्ये फोटो अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्या नोटेविषयी माहिती शोधून दिली जाते. कोणत्याही नोटेची माहिती या अ‍ॅपमधून मिळू शकते, त्यामुळे बनावट आणि असली नोटांमधील फरक समजण्यास मदत होते. हे अ‍ॅप iOS आणि Android दोन्ही युजर्ससाठी उपलब्ध आहे.  

Web Title: Fake Currency Note Identifying Apps For Android And iPhone 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.