Alert! कंगाल करतोय बनावट Telegram अ‍ॅप; आला अँटी-व्हायरसला देखील न सापडणारा मालवेयर

By सिद्धेश जाधव | Published: January 6, 2022 01:23 PM2022-01-06T13:23:29+5:302022-01-06T13:24:03+5:30

Fake Telegram: Telegram मेसेंजर अ‍ॅपची लोकप्रियता वाढली आहे. या लोकप्रियतेचा वापर हॅकर्स देखील करत आहेत. काही बनावट टेलीग्राम अ‍ॅप इंटरनेटवर आले आहेत, ज्यांचा वापर करून विंडोज पीसी सारखे डिवाइस हॅक केले जात आहेत.

Fake telegram app is being misused by malicious actors can put user information at risk  | Alert! कंगाल करतोय बनावट Telegram अ‍ॅप; आला अँटी-व्हायरसला देखील न सापडणारा मालवेयर

Alert! कंगाल करतोय बनावट Telegram अ‍ॅप; आला अँटी-व्हायरसला देखील न सापडणारा मालवेयर

Next

Fake Telegram: Telegram मेसेंजर अ‍ॅपची लोकप्रियता वाढली आहे. या लोकप्रियतेचा वापर हॅकर्स देखील करत आहेत. काही बनावट टेलीग्राम अ‍ॅप इंटरनेटवर आले आहेत, ज्यांचा वापर करून विंडोज पीसी सारखे डिवाइस हॅक केले जात आहेत. सायबर-सिक्योरिटी रिसर्चर्स मिनर्वा लॅब्सनुसार, मालवेयरग्रसित हे अ‍ॅप अँटी-व्हायरस सिस्टमच्या देखील नजरेत येत नाही. तसेच यात व मेसेजिंग अ‍ॅप्लिकेशन टेलीग्राम मध्ये फरक देखील सांगता येत नाही. 

संशोधकांनी या टेलिग्राम अ‍ॅपमध्ये 'पर्पल फॉक्स' मालवेयर असल्याचं सांगितलं आहे. हा मालवेयर सर्वप्रथम 2018 मध्ये दिसला होता. यातील रूटकिट क्षमता याला अँटी-व्हायरसपासून लांब ठेवते. सध्या या मालवेयरचा हल्ला जगभरातील संगणकांवर सुरु आहे आणि यासाठी टेलिग्राम मेसेंजरच्या विंडोज अ‍ॅप्लिकेशनचा वापर केला जात आहे. एकदा सिस्टममध्ये घुसल्यानंतर हा मालवेयर तुमच्या फाईल्सचा ताबा घेतो. 

बचाव कसा करावा 

अधिकृत सोर्सवरूनच टेलिग्रामच नव्हे तर सर्वच अ‍ॅप इन्स्टॉल करणे हा सर्वोत्तम उपाय आहे. विंडोजसाठी अनेक अधिकृत अ‍ॅप्स मायक्रोसॉफ्ट स्टोरवर उपलब्ध आहेत. त्यामुळे इंटरनेटवरील इतर कोणत्याही इंस्टॉलरचा वापर करणं टाळावं. तसेच ई-मेल, एसएमएस किंवा इन्स्टंट मेसेंजरवर आलेल्या कोणत्याही अनोळख्या लिंकवर क्लीक करून अ‍ॅप इन्स्टॉल करू नये.  

हे देखील वाचा:

1 नव्हे तर 2 बॅटरीजसह आला Realme GT 2 5G Phone; सोबत 65W Charging, 12GB RAM

Samsung कडून न्यू ईयरचं गिफ्ट; TV विकत घेतल्यास साउंडबार आणि टॅबलेट मोफत

Web Title: Fake telegram app is being misused by malicious actors can put user information at risk 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.