फास्टट्रॅक रिफ्लेक्स २.० फिटनेस बँड दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 05:47 PM2018-07-18T17:47:54+5:302018-07-18T17:48:12+5:30
फास्टट्रॅक कंपनीने आपला रिफ्लेक्स २.० हा नवीन फिटनेस बँड भारतीय ग्राहकांसाठी बाजारपेठेत उतारण्याची घोषरा केली आहे.
फास्टट्रॅक कंपनीने आपला रिफ्लेक्स २.० हा नवीन फिटनेस बँड भारतीय ग्राहकांसाठी बाजारपेठेत उतारण्याची घोषरा केली आहे.
या मॉडेलचे मूल्य १९९५ रूपये आहे. सध्या अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलवर सुरू असलेल्या ‘प्राईम डे सेल्स’मध्ये हा फिटनेस बँड उपलब्ध करण्यात आला आहे. अर्थात यावर लाँच होत असतांना विविध सवलती प्रदान करण्यात आल्या आहेत. याच्या अंतर्गत कुणीही ग्राहकाने एचडीएफसी बँकेचे क्रेडीट वा डेबीट कार्ड वापरून याची खरेदी केल्यास त्याला तात्काळ १० टक्के कॅशबॅक मिळणार आहे. तसेच कुणाही प्राईम युजरने ‘अमेझॉन पे’ प्रणालीचा वापर करून याला खरेदी केल्यास त्यालादेखील १० टक्के रक्कम कॅशबॅकच्या स्वरूपात मिळणार आहे.
फास्टट्रॅक रिफ्लेक्स २.० फिटनेस बँड हे मॉडेल आयपीएक्स६ प्रमाणित आहे. यामुळे याला पाण्यातदेखील वापरता येणार आहे. मात्र पोहण्यासाठी पाण्याशी दीर्घ काळ संबंध असतांना याला वापरता येणार नसल्याची बाब लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. यासोबत हे मॉडे डस्टप्रूफदेखील असल्यामुळे कोणत्याही वातावरणात याला सहजपणे वापरता येणार आहे. यात दर्जेदार बॅटरी असून ती एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल १० दिवसांचा बॅकअप देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. बहुतांश फिटनेस ट्रॅकरमध्ये बॅटरी हा महत्वाचा घटक असतो. या पार्श्वभूमिवर यातील बॅटरी उत्तम प्रकारातील असल्याचे दिसून येत आहे. अन्य फिटनेस ट्रॅकरप्रमाणे यातदेखील चाललेले अंतर, यातून वापरण्यात आलेल्या कॅलरीज आदींचे मापन करता येते. याशिवाय यामध्ये निद्रेचे मापन करण्याची सुविधादेखील देण्यात आली आहे. यामध्ये ओएलईडी या प्रकारातील डिस्प्ले देण्यात आला आहे. यावर याच्याशी संलग्न असणार्या स्मार्टफोनचे विविध नोटिफिकेशन्स पाहता येणार आहे. यात कॉल, एसएमएस, व्हाटसअॅप मॅसेंजर आदींशी संबंधीत नोटिफिकेशन्सचा समावेश राहणार आहे. ब्ल्युटुथ प्रणालीच्या मदतीने हा ट्रॅकर स्मार्टफोनशी कनेक्ट करता येणार आहे. तर अँड्रॉइड आणि आणि आयओएस अॅपच्या मदतीने युजर या ट्रॅकरचा वापर करू शकतो.
फास्टट्रॅक रिफ्लेक्स २.० फिटनेस बँडला शाओमीच्या मी बँड २चे तगडे आव्हान राहण्याची शक्यता आहे. यातील सर्व फिचर्स शाओमीच्या फिटनेस ट्रॅकरमध्ये असून याचे मूल्य १,५९९ रूपये इतके आहे. विशेष म्हणजे यात हार्ट रेट माॅनिटरची अतिरिक्त सुविधादेखील आहे.