Fastrack ब्रँडचा ब्लड प्रेशर ट्रॅक करणारा Smartwatch लाँच; लवकर खरेदी केल्यास 2,000 रुपयांची सूट
By सिद्धेश जाधव | Published: January 29, 2022 04:03 PM2022-01-29T16:03:18+5:302022-01-29T16:03:54+5:30
Budget Smartwatch: Fastrack Reflex Vox SpO2 सेन्सर, स्लिप ट्रॅकर, ब्लड प्रेशर मॉनिटर, हार्ट रेट आणि 10 दिवसांचा बॅटरी बॅकअपसह बाजारात आला आहे.
Fastrack नं आपल्या Reflex लाईनअपमध्ये पहिला स्मार्टवॉच भारतात लाँच केला आहे. हा स्मार्टवॉच भारतात Fastrack Reflex Vox नावानं सादर करण्यात आला आहे. यात अॅमेझॉन अॅलेक्सासाठी इनबिल्ट सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच यात SpO2 सेन्सर, स्लिप ट्रॅकर, ब्लड प्रेशर मॉनिटर, हार्ट रेट आणि 10 दिवसांचा बॅटरी बॅकअप देण्यात आला आहे.
Fastrack Reflex Vox ची किंमत
फास्टट्रॅकच्या या स्मार्टवॉचची किंमत 6,995 रुपये आहे. परंतु लाँच ऑफर अंतर्गत हा स्मार्टवॉच 2000 रुपयांच्या सवलतीसह विकत घेता येईल. सुरुवातीचे काही दिवस हा स्मार्टवॉच 4,995 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा वॉच कार्बन ब्लॅक, ब्लेजिंग ब्लू, शॅम्पेन पिंक आणि फ्लेमिंग रेड कलरमध्ये विकत घेता येईल. ऑफलाईन स्टोर्ससह फास्टट्रॅक वेबसाईट आणि अॅमेझॉनच्या माध्यमातून याची खरेदी करता येईल.
Fastrack Reflex Vox चे फीचर्स
Fastrack Reflex Vox स्मार्टवॉचमध्ये आयताकृती 1.69-इंचाचा एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. यात इनबिल्ट अॅमेझॉन अॅलेक्सा सपोर्ट मिळतो. तसेच 100 पेक्षा जास्त वॉच फेस पर्सनलाजेशनमध्ये मदत करतात. हा वॉच मल्टी-स्पोर्ट्स मोडसह सादर करण्यात आला आहे. हार्ट रेट मॉनिटर, Sp02 मॉनिटर, स्लीप ट्रॅकर, अॅक्टिव्हिटी ट्रॅकर, स्ट्रेस मॉनिटर, ब्लड प्रेशर आणि मेंस्ट्रुअल ट्रॅकर देखील देण्यात आला आहे. फास्टट्रॅक रिफ्लेक्स व्हॉक्स द्वारे म्यूजिक प्लेबॅक आणि कॅमेरा कंट्रोल करता येतात. यात हायड्रेशन अलर्ट आणि नोटिफिकेशन अलर्ट सारख्या सुविधा मिळतात. हा स्मार्टवॉच सिंगल चार्जवर 10 दिवसांचा बॅटरी बॅकअप देतो.
हे देखील वाचा:
5000mAh बॅटरी आणि 48MP कॅमेऱ्यासह येतोय स्वस्त 5G Phone; 'ही' कंपनी उडवणार शाओमी-रियलमीची झोप
स्मार्टफोनला कव्हर वापरताय? त्याचे तोटेही अनेक आहेत, समजल्यावर काढून टाकाल...