BGMI ला टक्कर देणार स्वदेशी FAUG? TDM मोडसह नवीन बीटा व्हर्जन सादर
By सिद्धेश जाधव | Published: June 28, 2021 02:30 PM2021-06-28T14:30:55+5:302021-06-28T14:32:28+5:30
FAU-G Team DeathMatch mode beta: TDM मोड एक मल्टी प्लेयर मोड आहे, त्यामुळे हा आधीच्या FAUG गेमपेक्षा वेगळा असेल.
काही दिवसांपूर्वी भारतात PUBG Mobile चा स्वदेशी अवतार Battlegrounds Mobile India चा बीट व्हर्जन उपलब्ध झाला होता. या गेमला टक्कर देण्यासाठी FAUG गेमची निर्मिती करणाऱ्या nCORE Games या स्वदेशी कंपनीने FAUG TDM मोडचा बीटा व्हर्जन रिलीज केला आहे. FAUG Team Deathmatch सर्व युजर्ससाठी उपलब्ध झाला नाही, हा बीटा व्हर्जन खेळण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल याची माहिती आम्ही इथे देत आहोत. (FAUG Team Deathmatch (TDM) mode beta release now available for download)
nCORE Games ने रविवारी ट्विटरवर आपल्या अधिकृत अकॉउंटवरून माहिती दिली कि, FAUG TDM मोडचा बीटा व्हर्जन डाउनलोडसाठी उपलब्ध झाला आहे. बीटा व्हर्जनसाठी खूप कमी स्लॉट उपलब्ध आहेत. जर तुम्हाला फॅजी टीम डेथमॅच लाँच होण्यापूर्वीच अनुभवायचा असेल तर या गेमचा अर्ली अॅक्सेस व्हर्जन डाउनलोड करावा लागेल.
Bullets will fly when FAUG face their dushman in deadly team battles! Join beta release of FAUG's TDM mode & let your feedback be heard! Limited slots only!
— nCORE Games (@nCore_games) June 27, 2021
Download now https://t.co/v9kL8PfnTC#LargestVaccineDrive#MaskUp@vishalgondal@akshaykumar@dayanidhimg@BharatKeVeerpic.twitter.com/ERw5fQj22T
FAUG Team Deathmatch Mode बीटा व्हर्जन डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला https://play.google.com/store/apps/details?id=com.ncoregames.faugmp वर जावे लागेल आणि गुगल प्ले स्टोरवरून हा डाउनलोड करावा लागेल.
TDM मोड एक मल्टी प्लेयर मोड आहे, त्यामुळे हा आधीच्या FAUG गेमपेक्षा वेगळा असेल. या मोडमध्ये तुम्ही इतर ऑनलाईन प्लेयर्ससोबत मिळून खेळू शकता. यात 5 प्लेयर्सची एक टीम असेल जी दुसऱ्या 5 प्लेयर्सच्या टीम विरोधात खेळेल.
नवीन मोडमध्ये आहे तरी काय
FAUG TDM mode मध्ये पहिल्यांदाच नवीन हत्यारे आणि बंदुका मिळतील. गेममध्ये Bazaar नावाचा नवीन TDM मॅप आहे. FAUG गेम यावर्षीच्या सुरुवातीला लाँच करण्यात आला होता, तेव्हा या गेममध्ये कॅम्पेन मोड देण्यात आला होता. या मोडमध्ये काही हत्यारे वापरण्यास मिळत होती. परंतु टीम थेडमॅचमध्ये प्लेयर्सना बंदूक, ग्रेनेड आणि इतर अनेक हत्यारे वापण्याची संधी मिळेल. या नवीन मोडच्या जीवावर FAUG अलीकडेच पुनरागमन करणाऱ्या BGMI ला टक्कर देईल का?