फेसबुकने 3 कोटी पोस्ट केल्या डिलीट; आक्षेपार्ह फोटो, माहिती व व्हिडीओंचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2018 10:43 AM2018-05-16T10:43:51+5:302018-05-16T10:43:51+5:30
एखादी घटना, त्या घटनेचे फोटो-व्हिडीओ अगदी काही सेकंदाच व्हायरल होतात.
मुंबई- फेसबुक ही सोशल नेटवर्किंग साइट दुनियाभरात कोट्यवधी लोक वापरतात. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रत्येक प्रकारचे वाद-विवाद पाहायला मिळतात. एखादी घटना, त्या घटनेचे फोटो-व्हिडीओ अगदी काही सेकंदाच व्हायरल होतात. तसंच अनेक आक्षेपार्ह पोस्ट फेसबुकवर पाहायला मिळतात. यासाठीच फेसबुकने महत्त्वाचं पाऊस उचललं आहे. 2018च्या पहिल्या तीन महिन्यात फेसबुकने जवळपास तीन कोटी पोस्ट डिलीट केल्या आहेत. यामध्ये आक्षेपार्ह मजकूर, फोटो व व्हि़डीओंचा समावेश आहे. फेसबुकच्या माध्यमातून समाजात द्वेषाची भावना पसरविण्यासाठी याचा वापर होत असल्याचा विचार करत फेसबुकने पोस्ट डिलीट केल्या आहेत.
कँब्रिज अॅनालिटिका डेटा प्रायव्हसी प्रकरणानंतर फेसबुकने पारदर्शकतेसाठी कम्युनिटी स्टॅडर्डच्या अंतर्गत सादर केलेल्या रिपोर्टमध्ये पोस्ट डिलीट केल्याचं सांगितलं. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करत फेसबुकने जवळपास 3 कोटी 40 लाख पोस्टवर कारवाई केली आहे. 2017च्या शेवटच्या तीन महिन्याच्या तुलनेत पोस्टचा आकडा तीनपट जास्त असल्याचं फेसबुकने सांगितलं.
फेसबुकने फेसबुकवरील 200 अॅप्सही हटवले या अॅप्सच्या माध्यमातून युजर्सची खासगी माहिती वापरल्याच्या संशयातून तपासणीसाठी हटविले आहेत. फेसबुकने जो कंटन्ट हटवला त्यामध्ये युजर्सला आक्षेपार्ह वाटणाराही मजकूर होता. दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या 19लाख पोस्ट फेसबुकने डिलीट केल्या. कुठलाही अलर्ट न देता ही कारवाई करण्यात आली आहे. लोकामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या 25 लाख पोस्ट हटविल्या आहेत.