FB, स्मार्टफोनमधून आपली खासगी माहिती चोरी होऊ नये यासाठी टिप्स...  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2018 04:08 PM2018-04-12T16:08:06+5:302018-04-12T16:08:18+5:30

आपल्यापैकी बहुतेक जण सोशल नेटवर्किंग साइटचा वापर करतात. स्मार्टफोन्सचा वापर सुद्धा गेल्या काही वर्षात वाढला आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे होणारे फायदे जसे अनेक आहेत, तसे तोटे देखील आहेत. यात अधोरेखित करता येण्याजोगा तोटा म्हणजे तुमच्या खासगी माहितीचे व्यापारीकरण.

FB, Tips to not steal your personal information from a smartphone ... | FB, स्मार्टफोनमधून आपली खासगी माहिती चोरी होऊ नये यासाठी टिप्स...  

FB, स्मार्टफोनमधून आपली खासगी माहिती चोरी होऊ नये यासाठी टिप्स...  

Next

- कविता दातार, सायबर सेक्युरीटी कंसल्टंट

आपल्यापैकी बहुतेक जण सोशल नेटवर्किंग साइटचा वापर करतात. स्मार्टफोन्सचा वापर सुद्धा गेल्या काही वर्षात वाढला आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे होणारे फायदे जसे अनेक आहेत, तसे तोटे देखील आहेत. यात अधोरेखित करता येण्याजोगा तोटा म्हणजे तुमच्या खासगी माहितीचे व्यापारीकरण. एकदा का आपण सोशल नेटवर्किंग साइटवर अथवा एखाद्या स्मार्टफोन अॅपवर आपल्याबद्दलची माहिती लिखित किंवा फोटो, व्हिडीओच्या स्वरूपात टाकली, की ती माहिती खासगी राहू शकत नाही.

कुठल्याही वेबसाइट किंवा अॅपचे दोन प्रमुख आर्थिक स्रोत म्हणजे जाहिराती आणि  वापरकर्त्यांची माहिती (users' data). बऱ्याचदा आपल्याला वेगवेगळ्या कंपनी, संस्था, शॉपिंग अथवा मार्केटिंग साइट्सकडून ई-मेल येतात. आपला ईमेल आयडी त्यांना कुठून मिळतो? याचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की, आपला ई-मेल आयडी यांना पुरवला जातो. लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकचे भारतात वीस कोटी युजर्स आहेत. दिवसागणिक यात वाढ होत आहे. लोकप्रियतेमुळे अनेक मार्केटींग कंपन्या फेसबुकच्या यादीत आहेत. यावरून युजर्स डेटाची उलाढाल किती प्रचंड प्रमाणात आहे याचा अंदाज येऊ शकतो. आज फेसबुकचे मार्केट कॅपिटल साधारणतः साडेचारशे ते पाचशे अब्ज डॉलर्स एवढे आहे. असे म्हणतात की कुठलीही सेवा जर आपल्याला विनामूल्य मिळत असेल तर त्यात आपणच प्रॉडक्ट असतो.

केंब्रिज अॅनालिटिका कंपनी प्रकरणाने यावर नव्याने प्रकाश टाकला गेला आहे. या प्रकरणात तर फेसबुकवरील एका अॅपच्या द्वारे युजर्सचा डेटा फेसबुकच्या नकळत चोरून केंब्रिज अॅनालिटिका कंपनीला अमेरिकन राष्ट्रपतिपदाच्या निवडणूक अभियानासाठी विकला गेला.

फेसबुकच्या सेटींग्स मध्ये "Download a copy of your Facebook data" असे लिहिलेली एक लिंक आहे. ती लिंक वापरून फेसबुकवरील आपला सुरुवातीपासूनच डेटा डाऊनलोड करता येतो यात वैयक्तिक माहिती, फोटो, व्हिडिओ, मेसेजेस, वॉल पोस्ट्स, आपल्या फ्रेंडलिस्टमधील लोकांचे ई मेल आयडी आणि मोबाईल नंबर असं सगळं काही मिळतं. एक साधारण हॅकर किंवा ज्याला आपला पासवर्ड माहीत असेल अशी व्यक्ती हा डेटा सहज मिळवू शकते. फेसबुकच नाही तर गुगल-प्लस, लिंक्डइन, ट्विटर आणि इतर कुठलीही वेबसाइट या प्रकारे आपल्या डेटाचा वापर करतात.

एवढेच नाही तर स्मार्टफोनच्या अँड्रॉइड, आयओएस यासारख्या ऑपरेटिंग सिस्टम्ससुद्धा आपल्या स्मार्टफोनवरील सगळा डेटा त्यांच्या सर्व्हरवर स्टोअर करून ठेवतात. त्यांचा सर्व्हर हॅक झाल्यास आपल्या डेटाचा दुरुपयोग होण्याची शक्यता असते. यावरून असं म्हणता येइल की आपल्या लिखित, फोटो आणि व्हिडिओ स्वरूपातील वैयक्तिक माहितीची विक्री, चोरी आणि दुरुपयोग शक्य आहे.

खासगी माहितीचे व्यापारीकरण पूर्णपणे टाळता येणे आजच्या काळात शक्य नसले तरीही काही गोष्टींची खबरदारी  आपण घेऊ शकतो.

- शक्यतो मोबाईल नंबर कुठल्याही वेबसाइटवर शेअर करणे टाळावे.

- खासगी आयुष्याबद्दलची सूक्ष्म माहिती, फोटो, व्हिडिओ सोशल नेटवर्किंग साइटवर पोस्ट करणे टाळावे. जुजबी माहिती फक्त पोस्ट करावी.

- सोशल मीडिया वापरत असताना त्यावरील दुसरे अनधिकृत अ‍ॅप वापरू नये. उदा. फेसबुकवर मल्लू अ‍ॅप सारखे अ‍ॅप्लिकेशन.

- आपले बँक खाते, पैसे, दागिन्यांविषयीची कसल्याही प्रकारची माहिती सोशल मीडियावर शेअर करणे टाळावे.

- स्मार्टफोनवर खासगी क्षणांचे फोटो, व्हिडिओ शक्यतो चित्रित करू नये, त्याऐवजी वैयक्तिक कॅमेराचा वापर करावा.

- स्मार्टफोनवर वापरत असलेल्या अॅप्सना जरुरी तेवढ्याच परमिशन्स द्याव्या.

- लॅपटॉप, कॉम्प्युटर आणि स्मार्टफोनवर हॅकिंग किंवा तत्सम गोष्टींपासून वाचण्यासाठी आणि डेटाच्या सुरक्षेसाठी चांगले इंटरनेट सिक्युरिटी अँटी व्हायरस वापरावे.

Web Title: FB, Tips to not steal your personal information from a smartphone ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.