सावधान! iPhone आणि Android युजर्सनी लगेचच डिलीट करा 'हे' मेसेज, स्कॅमर्सचा नवा फंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 11:40 IST2025-03-16T11:39:32+5:302025-03-16T11:40:12+5:30

एफबीआयने आयफोन आणि अँड्रॉइड युजर्सना अलर्ट केलं आहे.

fbi warning to iphone and android users beware of smishing texts sms | सावधान! iPhone आणि Android युजर्सनी लगेचच डिलीट करा 'हे' मेसेज, स्कॅमर्सचा नवा फंडा

सावधान! iPhone आणि Android युजर्सनी लगेचच डिलीट करा 'हे' मेसेज, स्कॅमर्सचा नवा फंडा

अमेरिकेच्या लॉ एनफोर्समेंट एजन्सी फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) ने एक महत्त्वाचा इशारा जारी केला आहे, ज्यामध्ये आयफोन आणि अँड्रॉइड मोबाईल युजर्सना  SMS (smishing) Text मेसेजपासून सावध राहण्यास सांगितलं आहे. अमेरिकेच्या अनेक राज्यांमध्ये अनेक लोक एसएमएस टेक्स्टचे बळी ठरत आहेत.

एफबीआयने आयफोन आणि अँड्रॉइड युजर्सना अलर्ट केलं आहे आणि त्यांना सांगितलं की, जर त्यांना सायबर फसवणुकीच्या उद्देशाने असा कोणताही मेसेज मिळाला तर तो लगेचच डिलीट करा. फोर्ब्सच्या रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे.

एसएमएस (Smishing) मेसेजेस म्हणजे काय?

smishing टेक्स्ट हे असे मेसेज आहेत जे सायबर गुन्हेगार निष्पाप लोकांना फसवण्यासाठी वापरतात. यामध्ये ते खोटा मेसेज पाठवतात आणि डिलिव्हरी किंवा बिल पेमेंटची मागणी करतात, ज्याची रक्कम सायबर स्कॅमर्सच्या खात्यात पोहोचते. यामुळे युजर्सचं मोठं आर्थिक नुकसान होतं.

१० हजार डोमेन रजिस्टर्ड

सायबर गुन्हेगारांनी जवळपास १० हजार डोमेन रजिस्टर्ड केल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे, ज्यांच्या मदतीने अनेक लोकांना बळी बनवता येतं. हे नवीन मेसेज सहजपणे डिटेक्ट करता येतात आणि ते लगेचच डिलीट करायला हवे. 

फक्त फसवणूक हा हेतू नाही

फेडरल ट्रेड कमिशनने नवीन स्कॅमपासून सावध राहण्याचा इशारा देखील दिला आहे, येथे स्कॅमर्स तुमचे पैसे चोरण्याचा प्रयत्न करणार नाहीत तर लिंकवर क्लिक केल्यानंतर ते तुमची पर्सनल माहिती आणि तुमची ओळख देखील चोरण्याचा प्रयत्न करतील.

फेक मेसेजच्या मदतीने अडकवतात जाळ्यात

स्कॅमर लोकांना फसवण्यासाठी खोटा मेसेज पाठवतात. या खोट्या मेसेजमध्ये बिल पेमेंटसारखे शब्द वापरले जातात. अशा मेसेजमध्ये, लोकांना घाबरवण्यासाठी लवकर पैसे न दिल्याबद्दल दंड असे शब्द समाविष्ट केले जातात. हा मेसेज एका सामान्य मेसेजसारखा आहे पण मेसेजमध्ये दिलेली लिंक तुम्हाला एका बनावट वेबसाइटवर घेऊन जाते. युजर्स पेमेंट करतात, जे सायबर फसवणूक करणाऱ्यापर्यंत पोहोचतात आणि प्रत्यक्ष बिल पेमेंट होत नाही. अशा परिस्थितीत युजर्सना आर्थिक नुकसान सहन करावं लागतं.

सावधगिरी बाळगण्यासाठी काय करावं?

जर तुम्हाला भारतात असा कोणताही मेसेज मिळाला तर ताबडतोब त्याची तक्रार करा आणि कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करू नका. या मेसेजमुळे तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं. कोणतंही बिल भरण्यासाठी किंवा पार्सल पेमेंट करण्यासाठी नेहमी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
 

Web Title: fbi warning to iphone and android users beware of smishing texts sms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.