१० हजारांच्या फोनमध्ये सव्वालाखाच्या आयफोन १४ प्रो चे फिचर; नवा स्मार्टफोन लाँच
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 11:42 AM2023-04-13T11:42:04+5:302023-04-13T11:42:54+5:30
हा फोन एवढा स्वस्त आहे की कोणालाही परवडेल. परंतू हा फोन ५ जी नसून ४जी वर चालणार आहे.
चीनची कंपनी रिअलमीने भारतीय बाजारात रिअलमी नारझो N55 स्मार्टफोन लाँच केला आहे. यामध्ये सव्वा लाखाच्या आयफोन १४ प्रोचे फिचर्स देण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे हा फोन एवढा स्वस्त आहे की कोणालाही परवडेल. परंतू हा फोन ५ जी नसून ४जी वर चालणार आहे.
आयफोन १४ मध्ये डायनामिक आयलँडसारखे फिचर देण्यात आले आहे. ते फ्रंट कॅमेराला कॅप्सुलच्या आकारात नोटीफिकेशन व इतर माहिती दाखविते. तसेच फिचर नारझो N55 मध्येही देण्यात आले आहे. याचे नाव 'इंटरैक्टिव मिनी कॅप्सूल' असे देण्यात आले आहे.
कंपनीने हा स्मार्टफोन दोन प्रकारात लॉन्च केला आहे. त्याच्या बेस व्हेरिएंट 4GB RAM + 64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 10,999 रुपये आहे आणि टॉप-एंड व्हेरिएंट 6GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 12,999 रुपये आहे. आज दुपारी १२ वाजता कंपनीने फ्लॅश सेल ठेवला आहे.
HDFC, SBI आणि ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डधारकांना बेस व्हेरिएंटवर रु. 500 आणि टॉप-एंड व्हेरियंटवर रु. 1000 ची सूट दिली जाणार आहे. 6.72-इंचाचा फुल HD + IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. MediaTek चा Helio G88 प्रोसेसर देण्यात आला आहे. DRE तंत्रज्ञानासह 4GB आणि 6GB LPDDR4x RAM चा पर्याय आहे, जो 12GB पर्यंत वाढवता येतो.
फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील पॅनलवर ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. 64-मेगापिक्सेलचा आणि 2MP चा कॅमेरा आहे. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8MP इन-डिस्प्ले कॅमेरा देण्यात आला आहे. ५००० एमएएचच्या बॅटरीला 33W SuperVOOC चार्जिंग देण्यात आले आहे. 63 मिनिटांत 0% ते 100% चार्ज होते.