Panasonic P100 : जाणून घ्या सर्व फिचर्स

By शेखर पाटील | Published: February 15, 2018 12:40 PM2018-02-15T12:40:53+5:302018-02-15T12:42:53+5:30

पॅनासोनिक पी १०० हा स्मार्टफोन निळा, काळा, सोनेरी आणि गडद राखाडी या चार रंगांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे.

Features of Panasonic P 100 Smartphone | Panasonic P100 : जाणून घ्या सर्व फिचर्स

Panasonic P100 : जाणून घ्या सर्व फिचर्स

Next

पॅनासोनिक कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी आपला पी १०० हा एंट्री लेव्हलचा स्मार्टफोन दोन व्हेरियंटमध्ये सादर करण्याची घोषणा केली आहे. पॅनासोनिक कंपनीने काही महिन्यांपूर्वीच पी ९९ हे मॉडेल सादर केले होते. यानंतर पॅनासोनिक  पी ९१ हे मॉडेल लाँच करण्यात आले होते. याचीच पुढील आवृत्ती पी १०० या मॉडेलच्या स्वरूपात बाजारपेठेत लाँच करण्यात आली आहे. पॅनासोनिक पी १०० हा स्मार्टफोन ग्राहकांना १ जीबी आणि २ जीबी रॅमच्या पर्यायांमध्ये अनुक्रमे ५,२९९ रूपये आणि ५,९९९ रूपये मूल्यात फ्लिपकार्ट या शॉपिंग पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. या दोन्ही व्हेरियंटमध्ये १६ जीबी इनबिल्ट स्टोअरेज असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे.

पॅनासोनिक पी १०० या मॉडेलमध्ये ५ इंच आकारमानाचा आणि एचडी क्षमतेचा (१२८० बाय ७२० पिक्सल्स) डिस्प्ले देण्यात आला असून यावर २.५ डी वक्राकार ग्लासाचा लेअर प्रदान करण्यात आला आहे. यात क्वॉड-कोअर मीडियाटेक एमटी ६७५० हा प्रोसेसर असेल. यात एलईडी फ्लॅशसह मुख्य कॅमेरा ८ ते सेल्फी कॅमेरा ५ मेगापिक्सल्सचा देण्यात आला आहे. याच्या मुख्य कॅमेर्‍यात मल्टी-मोड देण्यात आला असून याच्या मदतीने अतिशय उच्च दर्जाची छायाचित्रे घेता येत असल्याचा कंपनीचा दावा आहे. तर याच्या मागील बाजूस फिंगरप्रिंट स्कॅनरची सुविधा देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारा असून यात २२०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. पॅनासोनिक पी १०० हा स्मार्टफोन निळा, काळा, सोनेरी आणि गडद राखाडी या चार रंगांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. यासाठी कंपनीने गोल्ड उत्सव कंझ्युमर ऑफर जाहीर केली आहे. याच्या अंतर्गत निवडक ग्राहकांना लकी ड्रॉच्या माध्यमातून १० ग्रॅमपर्यंत सोने जिंकता येणार आहे.
 

Web Title: Features of Panasonic P 100 Smartphone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.