अॅप्पल वॉच सारखं दिसणारं फाडू Smartwatch लाँच; फुल चार्जमध्ये 5 दिवस वापरता येणार
By सिद्धेश जाधव | Published: April 22, 2022 05:53 PM2022-04-22T17:53:36+5:302022-04-22T17:54:14+5:30
अॅप्पल वॉच प्रमाणे दिसणार Fire Boltt Ninja Pro Plus स्मार्टवॉच भारतात आलं आहे. सिंगल चार्जवर हे घड्याळ 5 दिवस वापरता येतं, असा दावा कंपनीनं केला आहे.
अॅप्पल वॉच प्रमाणे दिसणार Fire Boltt Ninja Pro Plus स्मार्टवॉच भारतात आलं आहे. सिंगल चार्जवर हे घड्याळ 5 दिवस वापरता येतं, असा दावा कंपनीनं केला आहे. यात SpO2 सेन्सर, हार्ट रेट सेन्सर, स्लिप ट्रॅकर आणि 30 स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या वॉचमध्ये वेळ घालवण्यासाठी काही गेम्स देखील कंपनीनं दिले आहेत.
Fire Boltt Ninja Pro Plus ची वैशिष्ट्ये
Fire Boltt Ninja Pro Plus मध्ये 1.69 इंचाचा फुल टच स्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 240x280 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. मेनू अॅक्सेस करण्यासाठी डावीकडे एक बटन मिळतो. वॉचमध्ये 2048 आणि फ्लॅपी बर्ड क्लोन, असे काही बिल्ट-इन गेम्स मिळतात. हे वॉच सिंगल चार्जवर 5 दिवस वापरता येईल, असा कंपनीनं केला आहे.
Fire Boltt Ninja Pro Plus मधील हार्ट रेट सेन्सर तुमच्या हृदयावर चौवीस तास लक्ष ठेवतो. ब्लड ऑक्सिजन लेव्हल बघण्यासाठी SpO2 सेन्सर आहे. तसेच यात 30 स्पोर्ट्स मोड मिळतात. फीमेल हेल्थ सायकल, मेडिटेटिव्ह ब्रीदिंग, स्टेप्स काउंटर आणि स्लीप ट्रॅकिंग फिचर देखील आहे. अन्य फीचर्स पाहता, 2 एटीएम वॉटर-रेजिस्टन्स रेटिंग, क्लाउड-बेस्ड वॉच फेस, कॅमेरा कंट्रोल, म्यूजिक कंट्रोल, स्मार्ट नोटिफिकेशन, स्प्लिट-स्क्रीन ऑप्शन आणि वेदर अपडेट देखील मिळवता येतात.
किंमत
फायर-बोल्ट निंजा प्रो प्लसची किंमत 7999 रुपये आहे परंतु हे घड्याळ फ्लिपकार्टवर 5,500 रुपयांच्या डिस्काउंटनंतर 2,499 रुपयांमध्ये विकलं जात आहे. याची विक्री 24 एप्रिलला दुपारी 12 वाजल्यापासून केली जाईल. फ्लिपकार्टवर ब्लॅक, रेड, ब्लू, पिंक, ग्रे आणि ग्रीन असे कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध होतील.