एकदा चार्ज करा आणि 7 दिवस विसरून जा; ‘इतकी’ आहे Fire Boltt च्या स्टायलिश Smartwatch ची किंमत
By सिद्धेश जाधव | Published: April 4, 2022 12:53 PM2022-04-04T12:53:29+5:302022-04-04T12:53:42+5:30
Fire Boltt Ring 2 स्मार्टवॉचनं भारतात हार्ट रेट मॉनिटर, SpO2 सेन्सर आणि स्लिप मॉनिटरसह एंट्री घेतली आहे.
Fire Boltt या स्वदेशी कंपनीनं आपल्या स्मार्टवॉच पोर्टफोलियोमध्ये Fire Boltt Ring 2 Smartwatch ची भर टाकली आहे. यात SpO2 सेन्सर, हार्ट रेट मॉनिटर, आणि स्लिप मॉनिटर सारखे हेल्थ फीचर्स देण्यात आले आहेत. सोबतच चांगली बॅटरी लाईफ, वॉयस असिस्टंटला सपोर्ट आणि स्पोर्ट्स मोड्स मिळतात. चला जाणून घेऊया या वॉचची किंमत आणि फीचर्स.
Fire Boltt Ring 2 ची किंमत
Fire Boltt Ring 2 स्मार्टवॉचची किंमत भारतात 4,499 रुपये ठेवण्यात आली आहे. हे वॉच ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरून येत्या 6 एप्रिलपासून विकत घेता येईल. कंपनीनं या वॉचचे ब्लॅक, क्रीम, ब्लू आणि व्हाईट, असे चार कलर व्हेरिएंट सादर केले आहेत.
Fire Boltt Ring 2 चे स्पेसिफिकेशन्स
Fire Boltt Ring 2 मध्ये 1.69-इंचाचा 240 x 280 पिक्सल रिजोल्यूशन असलेला डिस्प्ले देण्यात आला आहे. यात एक स्ट्रेस मॅनेजमेन्ट सिस्टम देखील देण्यात आली आहे. यात हार्ट रेट, बीपी, SPO2, स्लीप आणि मेडिटेटिव ब्रीदिंगसह अनेक ट्रॅकर्स देण्यात आलेत आहे. यात तुम्हाला 30 स्पोर्ट्स मोड्स आणि अनेक क्लाउड-बेस्ड वॉच फेस देण्यात येतील.
यातील इन-बिल्ट माईक आणि स्पिकरच्या मदतीनं तुम्ही व्हॉइस कॉलिंगचा फायदा घेऊ शकता. या स्मार्टवॉचवर तुमच्या फोनचे कॉल लॉग्स आणि एक क्विक डायल पॅड देखील मिळतो. तसेच तुम्ही यावर कॉन्टॅक्ट्स देखील सेव्ह करू शकता. हे स्मार्टवॉच IP67 रेटिंगसह बाजारात आलं आहे, त्यामुळे धूळ आणि पाण्यापासून कोणताही धोका संभवत नाही. हे स्मार्टवॉच सिंगल चार्जवर 7 दिवस बिनदिक्कत वापरता येईल, असा दावा कंपनीनं केलं आहे.