एकाच किंमतीत गेमिंग लॅपटॉप आणि टॅबलेटही! जगातील पहिला डिटॅचेबल 2 इन 1 गेमिंग टॅबलेट लाँच 

By सिद्धेश जाधव | Published: June 23, 2022 10:34 AM2022-06-23T10:34:04+5:302022-06-23T10:34:20+5:30

Asus नं भारतात नवीन ROG Flow Z13 2-in-1 गेमिंग टॅबलेट लाँच केला आहे.  

first detachable 2 in 1 gaming tablet Asus rog flow z13 tablet launched in india  | एकाच किंमतीत गेमिंग लॅपटॉप आणि टॅबलेटही! जगातील पहिला डिटॅचेबल 2 इन 1 गेमिंग टॅबलेट लाँच 

एकाच किंमतीत गेमिंग लॅपटॉप आणि टॅबलेटही! जगातील पहिला डिटॅचेबल 2 इन 1 गेमिंग टॅबलेट लाँच 

Next

ASUS नं गेमिंग ब्रँड ROG अंतर्गत नवीन टॅबलेट लाँच भारतीयांच्या भेटीला आणला आहे. जगातील पहिला 2 इन 1 गेमिंग टॅबलेट ROG Flow Z13 नावानं बाजारात आला आहे. यात 4K डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट, 16GB RAM, Intel Core i9-12900H CPU आणि Nvidia GeForce RTX 3050 Ti GPU असे दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. चला जाणून घेऊया याची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स.  

ROG Flow Z13 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स 

ROG Flow Z13 मध्ये गेमिंगसाठी देण्यात आलेली नवीन डिजाइन पोर्टेबिलिटी भर देते. डिवाइसमध्ये किकस्टॅन्ड टॅबलेट म्हणून वापरण्यासाठी देण्यात आला आहे. सोबत इनबिल्ट कीबोर्ड देखील देण्यात आला आहे. ROG Flow Z13 मध्ये 13.4 इंचाचा टच स्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 4K रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. यात युजर फुल HD आणि 120Hz रिफ्रेश रेट किंवा 4K रिजोल्यूशन आणि 60Hz रिफ्रेश रेटवर वापरू शकतात. हा लॅपटॉप 16:10 अस्पेक्ट रेश्यो आणि 500 निट्स पीक ब्राईटनेसला सपोर्ट करतो.  

टॅबलेटमध्ये पावरफुल Intel Core i9-12900H CPU देण्यात आला आहे, सोबत Nvidia GeForce RTX 3050 Ti GPU देखील आहे. हा टॅबलेट बाह्य GPU ला देखील सपोर्ट करतो. इस 2-इन-1 गेमिंग टॅबलेटमध्ये 16GB 5200MHz DDR5 रॅम, 1TB SSD स्टोरेज मिळते. कनेक्टिव्हिटीसाठी एक थंडरबोल्ट 4 पोर्ट, एक यूएसबी 2.0 टाइप-ए, मायक्रो एसडी कार्ड रीडर आणि यूएसबी 3.2 जेन 2 टाइप-सी पोर्टसह अनेक पोर्ट मिळतात. या टॅबलेटचं वजन फक्त 1.1 किलोग्राम आहे.  

ROG Flow Z13 ची किंमत 

ASUS ROG Flow Z13 ची किंमत 1,36,990 रुपये ठेवण्यात आली आहे. याची खरेदी कंपनीच्या अधिकृत वेबसाईटसह Amazon, Flipkart आणि प्रमुख रिटेल स्टोर्सवरून करता येईल.  

Web Title: first detachable 2 in 1 gaming tablet Asus rog flow z13 tablet launched in india 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.