Micromax In 1b चा पहिला सेल थोड्याच वेळात; जाणून घ्या किंमत आणि ऑफर्स
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2020 11:37 AM2020-11-26T11:37:02+5:302020-11-26T11:37:40+5:30
मायक्रोमॅक्सच्या मोबाईलचा पहिला सेल असल्याने याकडे भारतीयांचे लक्ष लागले आहे. आज दुपारी 12 वाजता फ्लिपकार्ट आणि मायक्रोमॅक्सच्या वेबसाईटवर हा सेल सुरु होणार आहे.
मोठ्या काळानंतर भारतीय स्मार्टफोन कंपनी मायक्रोमॅक्सने भारतीय बाजारात पुनरागमन केले आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीला ऑनलाईन इव्हेंटमध्ये कंपनीने दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत. यापैकी सर्वात स्वस्त Micromax In 1b या फोन चा आज फ्लॅश सेल फ्लिपकार्टवर आयोजित करण्यात आला आहे. या सेलमध्ये काही ऑफर्स लागू असणार आहेत.
मायक्रोमॅक्सच्या मोबाईलचा पहिला सेल असल्याने याकडे भारतीयांचे लक्ष लागले आहे. आज दुपारी 12 वाजता फ्लिपकार्ट आणि मायक्रोमॅक्सच्या वेबसाईटवर हा सेल सुरु होणार आहे. या फोनचे दोन व्हेरिअंट आहेत. Micromax In 1B ला 4 जीबी रॅम 64 जीबी स्टोरेजसह बाजारात आणण्यात आला आहे. या फोनची किंमत 7,999 रुपये ठेवण्यात आली आहे. दुसरे व्हेरिअंट 2 जीबी रॅम 32 जीबी स्टोरेजचे आहे. याची किंमत 6,999 रुपये ठेवण्यात आली आहे.
Micromax In 1B ची किंमत खूपच परवडणारी ठेवण्यात आली आहे. 6.5 इंचाचा HD+ रिझोल्युशन डिस्प्ले देण्यात आला आहे. MediaTek चा Helio G35 प्रोसेसर देण्यात आला आहे. माठीमागे 13 मेगापिक्सल प्राइमरी सेंसरचा ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये २ मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फीसाठी 8 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. टाईप सी चार्जिंग कनेक्टिविटी देण्यात आली आहे. 5000एमएएच बॅटरी 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. अँड्रॉईड 10 ऑपरेटिंग सिस्टिम देण्यात आली असून महत्वाचे म्हणजे अँड्रॉईड 11 आणि 12 अपडेट देण्य़ात येणार आहे.
ऑफर्स काय?
लाँच ऑफरद्वारे Flipkart वर या फोनवर अॅक्सिस बँकेच्या कार्डवर 5 टक्के कॅशबॅक देण्यात येणार आहे. याशिवाय नो कॉस्ट ईएमआय देखील मिळणार आहे.
Micromax In Note 1 देखील बाजारात
Micromax In Note 1 मध्ये 6.67 इंचाचा IPD LCD डिस्प्ले फुल HD+ रिझोल्युशनसह देण्यात आला आहे. हे डिव्हाईस MediaTek Helio G85 प्रोसेसर देण्यात आला आहे. गेमिंग करणाऱ्या युजरसाठी तो चांगला परफॉर्मन्स देतो. कॅमेरा सेटअप- AI क्वॉड रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये 48 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. तसेच 5 एमपी अल्ट्रा वाईड, २ एमपी मॅक्रो आणि २ एमपी डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. 5000एमएएच बॅटरी 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. अँड्रॉईड 10 ऑपरेटिंग सिस्टिम देण्यात आली असून महत्वाचे म्हणजे अँड्रॉईड 11 आणि 12 अपडेट देण्य़ात येणार आहे. सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.