पहिल्यांदाच अशी वेळ? व्हिवो-ओप्पोचा सेल पहाल तर..., कंपन्यांची विक्री पडली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 03:57 PM2023-04-19T15:57:34+5:302023-04-19T15:58:09+5:30
भारतात सध्या ६०० दशलक्ष स्मार्टफोन युजर आहेत. एवढ्या मोठ्या मार्केटला स्मार्टफोन पुरविता पुरविता स्मार्टफोन कंपन्यांनी दमछाक होत होती.
भारतीय स्मार्टफोन बाजारात आता ५जी स्मार्टफोनची चलती आहे. ज्याला त्याला फाईव्ह जी स्मार्टफोन हवे आहेत. दोन टेलिकॉम कंपन्या दिवसेंदिवस छोट्या छोट्य़ा शहरांमध्ये फाईव्ह जीची सेवा विस्तारत आहेत. असे असताना भारतीयांना मात्र जुन्याच स्मार्टफोनवर खुश रहावे लागत असल्याचे समोर आले आहे.
भारतात सध्या ६०० दशलक्ष स्मार्टफोन युजर आहेत. एवढ्या मोठ्या मार्केटला स्मार्टफोन पुरविता पुरविता स्मार्टफोन कंपन्यांनी दमछाक होत होती. परंतू आता मागणी घटल्याचे चित्र आहे. २०२३ च्या पहिल्या तिमाहीत स्मार्टफोनच्या मागणीत विक्रमी घसरण झाली आहे. याचाच अर्थ फाईव्ह जी लाँच झाल्यानंतर भारतात स्मार्टफोनची विक्री थंडावत चालली आहे.
मार्केट रिसर्च फर्म Canalys नुसार भारतात स्मार्टफोन शिपमेंटमद्ये गेल्या तिमाहीपेक्षा २० टक्क्यांची घट आली आहे. स्मार्टफोनची विक्री कमी होण्यामागे अनेक कारणे आहेत. महागाई दरात झालेली वाढ हे त्याचे प्रमुख कारण असल्याचे मानले जात आहे. याशिवाय, ग्राहकांच्या मागणीचा अभाव, इंवेन्ट्रीमध्ये घट आणि सुट्या भागांची कमतरता यामुळे स्मार्टफोन विक्रीत घट नोंदवली जात आहे.
2022 च्या चौथ्या तिमाहीत सॅमसंगने पुन्हा एकदा शाओमीला मागे टाकले होते. सॅमसंगचा बाजारातील हिस्सा सुमारे 21 टक्के होता, तर शिपमेंट 6.3 दशलक्ष होते. तर शाओमी धक्कादायक रित्या चौथ्या स्थानावर फेकला गेली होती. ओप्पो आणि व्हिवोने अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला होता. महत्वाचे म्हणजे ओप्पो आणि व्हिवो या एकच व्हिवोच्या कंपन्या आहेत. म्हणजेच भारतात सध्या व्हिवोचा दबदबा आहे.
सॅमसंगने ऑनलाईन पेक्षा ऑफलाईन मार्केटमध्ये मुसंडी मारली आहे. 5G पावर्ड A-सीरीज स्मार्टफोनला मोठी मागणी नोंदविली गेली आहे.
स्मार्टफोन ब्रँड शिपमेंटचे आकडे...
सॅमसंग - 6.3 दशलक्ष शिपमेंट
Oppo - 5.5 दशलक्ष शिपमेंट
Vivo - 5.4 दशलक्ष शिपमेंट
Xiaomi - 5 दशलक्ष शिपमेंट