‘या’ स्मार्टवॉचमुळे भाजत आहेत युजर्सचे हात; लोकप्रिय कंपनीनं परत मागवले 10 लाख युनिट्स, हे आहे कारण  

By सिद्धेश जाधव | Published: March 3, 2022 03:18 PM2022-03-03T15:18:50+5:302022-03-03T15:19:19+5:30

Fitbit आपल्या एका स्मार्टवॉच सीरिजचे 10 लाखांपेक्षा जास्त यूनिट्स पार्ट मागवले आहेत. अनेक युजर्सनी या स्मार्टवॉचमध्ये ओव्हरहीटिंगची तक्रार केली होती.  

Fitbit recalled iconic smartwatch 1 million units due to overheating and burns  | ‘या’ स्मार्टवॉचमुळे भाजत आहेत युजर्सचे हात; लोकप्रिय कंपनीनं परत मागवले 10 लाख युनिट्स, हे आहे कारण  

‘या’ स्मार्टवॉचमुळे भाजत आहेत युजर्सचे हात; लोकप्रिय कंपनीनं परत मागवले 10 लाख युनिट्स, हे आहे कारण  

googlenewsNext

Fitbit ही स्मार्ट अ‍ॅक्सेसरीज सेगमेंटमधील लोकप्रिय कंपनी आहे. परंतु आता या कंपनी बाबत एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. कंपनीनं आपल्या Iconic सीरिजमधील 10 लाखांपेक्षा जास्त स्मार्टवॉच परत मागवले आहेत. या स्मार्टवॉचेसमध्ये ओव्हरहीटिंग होत होतं. रिपोर्टनुसार, आतापर्यंत 115 पेक्षा जास्त रिपोर्ट्समधून ही समस्या समोर आली आहे. यातील 59 पेक्षा जास्त रिपोर्ट अमेरिकेतील आहे. अनेक रिपोर्ट्समध्ये सेकंड आणि थर्ड डिग्रीपर्यंतच्या बर्नची प्रकरणं समोर आली आहेत.  

Iconic स्मार्टवॉचमधील समस्या पाहून कंपनीनं अमेरिकेत विकलेले 10  लाख स्मार्टवॉच परत मागवले आहेत. जागतिक बाजारात कंपनीनं या स्मार्टवॉचचे 6,93,000 युनिट्स विकले आहेत. Fitbit च्या या प्रीमियम स्मार्टवॉच Iconic ची किंमत 299 डॉलर्स (जवळपास 22,643 रुपये) आहे. या वॉचची निर्मिती 2020 मध्ये सुरु करण्यात आली होती. Fitbit चे स्मार्टवॉच वापरणाऱ्या युजर्सना नियामक मंडळानं आग्रह केला आहे कि, तात्काळ या स्मार्टवॉचचा वापर बंद करावा. युजर्सना यासाठी रिफंड किंवा डिस्काउंट देण्यात येईल. 

ओव्हरहिट होणारे मॉडेल्स 

  1. Ionic FB503CPBU – Slate Blue/Burnt Orange 
  2. Fitbit Ionic FB503GYBK – Charcoal/Smoke Gray 
  3. Ionic FB503WTGY – Blue Gray/Silver Gray 
  4. Fibit Ionic FB503WTNV – Adidas edition, Ink Blue & Ice Gray/Silver Gray 

रिफंडची प्रोसेस 

Fitbit च्या वरील मॉडेल्सचे युजर्स हेल्पलाइन नंबर 888-925-1764 वर कॉल करू शकतात किंवा help.fitbit.com/ionic आणि www.fitbit.com वर जाऊन प्रोडक्ट हेल्पवर क्लिक करू शकतात. युजर्सना या स्मार्टवॉचचा संपूर्ण रिफंड किंवा 40 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट देण्यात येईल.  

हे देखील वाचा:

Web Title: Fitbit recalled iconic smartwatch 1 million units due to overheating and burns 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.