#Flashback2017 : हे आहेत, 2017 मधील अपयशी ठरलेले स्मार्टफोन्स !
By ravalnath.patil | Published: December 25, 2017 07:04 PM2017-12-25T19:04:09+5:302017-12-25T19:17:38+5:30
सध्या 4 जी नेटवर्कचा जमाना आहे, त्यामुळे सर्रास पाहिले असता सर्वांच्या हातात स्मार्टफोन पाहायला मिळतो. स्मार्टफोनच्या वापरामुळे मोबाईल कंपन्या सुद्धा तेजीत असल्याचे दिसून येते. अनेक कंपन्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन फिचर्स असलेले स्मार्टफोन्स बाजारात आणले.
मुंबई : सध्या 4 जी नेटवर्कचा जमाना आहे, त्यामुळे सर्रास पाहिले असता सर्वांच्या हातात स्मार्टफोन पाहायला मिळतो. स्मार्टफोनच्या वापरामुळे मोबाईल कंपन्या सुद्धा तेजीत असल्याचे दिसून येते. अनेक कंपन्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन फिचर्स असलेले स्मार्टफोन्स बाजारात आणले. त्याचबरोबर स्मार्टफोन्सवर सेलच्या माध्यमातून ऑफर आणल्या. त्यामुळे गेल्या वर्षभरात अनेक स्मार्टफोन्सला ग्राहकांची मागणी वाढल्यामुळे मोबाईल कंपन्या चर्चेचा विषय ठरल्या. मात्र, याच काही कंपन्याचे स्मार्टफोन्स बाजारात अयशस्वी ठरले. असेच, काही 2017 मध्ये अपयशी ठरलेले स्मार्टफोन खालील प्रमाणे आहेत.
Sony Xperia XA1 Ultra
सोनी कंपनीने एक्सपीरिया सिरीजमध्ये अनेक स्मार्टफोन बाजारात आणले. मात्र, या सिरीजमधील सोनी एक्सपीरिया एस ए1 अल्ट्रा या स्मार्टफोनला म्हणावे तसे यश मिळाले नाही. या स्मार्टफोनची किंमत सुद्धा जास्त असून यामध्ये काही बेसिक फिचर्सचा अभाव दिसून आला, जो इतर दहा हजार रुपयापर्यंत मिळणा-या स्मार्टफोनमध्ये देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये कॅमे-याची क्षमता चांगली देण्यात आली. मात्र एवढ्या महागड्या फोनमध्ये फिंगरप्रिन्ट सेन्सर्सची कमतरता जाणवत होती. हा स्मार्टफोन बाजारात आल्यानंतर यामध्ये 6 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले, मीडिया टेक हेलिओ P20 प्रोसेसर देण्यात आला. तसेच, 23 मेगा पिक्सल रिअर कॅमेरा आणि जलद चार्जिग होणा-या सपोर्टसह 2700mAh इतक्या क्षमतेची बॅटरी देण्यात आली.
BlackBerry KEYone
ब्लॅकबेरी कंपनीचे संपूर्ण जगभरात नाव प्रसिद्ध असले, तरी ब्लॅकबेरी कंपनीचे स्मार्टफोन भारतात वापरणारा एक ठराविक वर्ग आहे. त्यामुळे भारतीय मोबाईल मार्केटमध्ये ब्लॅकबेरी स्मार्टफोनचा म्हणाला इतका प्रभाव दिसून आला नाही. कारण या स्मार्टफोनची किंमत सुद्धा सर्व सामान्यांना परवडण्या पलिकडे आहे. असे असले तरी ब्लॅकबेरीच्या काही स्मार्टफोन्सना भारतात यावर्षी चांगली मागणी होती. कंपनीने स्वत:ची ऑपरेटिंग सिस्टिम आणली होती, तसेच अॅन्ड्राईड ऑपरेटिंग सिस्टिमचा ऑप्शन सुद्धा दिला. मात्र, या कंपनीचा ब्लॅकबेरी की-वन हा स्मार्टफोन बाजारात फेल ठरल्याचे बोलले जात आहे. ज्यावळी ब्लॅकबेरी की-वन बाजारात आला, त्यावेळी 39,999 रुपयांचा टॅग लावून आला होता. परंतू यामध्ये साधारण स्पेसिफिकेशन्स होते. तसेच, ब्लॅकबेरी की-वनमध्ये उत्तम प्रकारचे सिक्युरिची फिचर्सही देण्यात आले. मात्र. याच्या हार्डवेअर विभागामध्ये काही अभाव असल्याचे दिसून आले. ब्लॅकबेरी की- वनमध्ये 4.5 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 625, 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज मेमरी दिली आहे. तर अॅन्ड्राईड 7.0 नॉगट ऑपरेटिंग सिस्टिम आणि 12 मेगा पिक्सल रिअर कॅमेरा व 3505 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.
Xiaomi Mi Mix 2
ठराविक बजेटमधील स्मार्टफोन्स आणून शाओमी कंपनीने भारतीय स्मार्टफोन्स मार्केटमध्ये आपला पाया भक्कम केला. कंपनीने आपल्या स्मार्टफोन्सची किंमत तीस हजार रुपयांच्यावरपर्यंत खेचून नेण्याचा भानगडीत पडली नाही. कारण, कंपनीने Mi Mix 2 हा पहिला बझल-लेस असेलेला स्मार्टफोन भारतात आणला. त्यावेळी त्याची किंमत 35,999 इतकी होती. शाओमीचा हा स्मार्टफोन खरेदी करणा-या ग्राहकांची संख्या म्हणावी तशी दिसून न आल्यामुळे कंपनी या स्मार्टफोनच्या दरात दोन हजार रुपयांची कपात केली. मात्र, याकडे ग्राहकांनी पाठ फिरविली. गेल्यावर्षी कंपनीने Mi 5 आणला होता. त्याप्रमाणेच हा स्मार्टफोन सुद्धा अयशस्वी ठरला. या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 835 प्रोसेसरसह 6 जीबी रॅम, 5.99 इंच फुल स्क्रीन डिस्प्ले, 12 एमपी रिअर कॅमेरी आणि 3400mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
Asus Zenfone AR
असूस झेनफोन एआर हा असा स्मार्टफोन आहे की एआर आणि व्हीआर सपोर्ट करणारा जगातील पहिला स्मार्टफोन आहे. मात्र, हा स्मार्टफोन ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यास कमी पडला. भारताच्या स्मार्टफोन मार्केटमध्ये एआर आणि व्हीआर दोन्ही हॉट ट्रेन्डमध्ये चालले नाहीत. त्यामुळे मार्केटमध्ये या स्मार्टफोनला स्थान मिळाले नाही. अॅन्ड्राईड 7.0 नॉगट ऑपरेटिंग सिस्टिमवर चालणा-या या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 821 प्रोसेसर आणि 8 जीबी रॅम देण्यात आली आहे. तसेच, इतर फिचर्ससह 5.7 इंचाचा डिस्प्ले, 23 एमपी रिअर कॅमेरा आणि 3300mAh इतकी क्षमता असलेली बॅटरी आहे.
LG G6
नामांकित कंपनी एलजीने आपल्या एलजी जी 5 स्मार्टफोनच्या अपयशानंतर एलजी जी 6 स्मार्टफोनकडे पूर्णपणे लक्ष केंद्रित केले. एलजी जी 6 हा स्मार्टफोन कंपनीने पहिला फुल व्हिजन डिस्प्ले बाजारात आणला. त्याचबरोबर, अनेक चांगल्या ऑफर्स सुद्धा आणल्या. मात्र, एलजी जी 6 ग्राहकांना आकर्षिक करण्यास फोल ठरला. हा स्मार्टफोन लॉंच केल्यापासून कंपनीने तीनवेळी त्याच्या किंमतीत कपात केली. तरी सुद्धा या स्मार्टफोनची खरेदी करणारे ग्राहक काही प्रमाणात दिसून आले. एलजी जी 6 मध्ये 5.7 इंच फुल व्हिजन डिस्प्ले देण्यात आला. त्याचबरोबर, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 821 प्रोसेसरसह 4 जीबी रॅम, 32 जीबी इंटरनल स्टोरेज मेमरी आणि 3300mAh इतक्या क्षमतेची बॅटरी आहे.
Vivo V7+
विवो कंपनीने भारतात यंदा फ्लॅगशिप स्मार्टफोन विवो व्ही 7 प्लस लॉंच केला. विवो व्ही 7 प्लसच्या लॉंचिंगनंतर कंपनीला या स्मार्टफोनच्याबाबत काही प्रमाणात टीकात्मक प्रतिक्रियांचा सामना करावा लागला. क्वालकॉम स्नॅपड्रगन 450 प्रोसेसर असलेल्या विवो व्ही 7 प्लॅसमध्ये 24 मेगा पिक्सल सेल्फी कॅमेरा असल्याचा दावा करण्यात आला होता. तथापि, माहितीनुसार क्वालकॉम प्रोसेसर हाय पिक्सेलचा फ्रन्ट कॅमेराच्या क्षमतेचा नसल्याचे कळाले. त्यानंतर कंपनी असा दावा केला की, 24 मेगा पिक्सलसाठी या स्मार्टफोनच्या सॉफ्टवेअरमध्ये काही सुधारणा केल्या आहेत. दरम्यान, असे असले तरी विवो व्ही 7 प्लसला म्हणावा तसा प्रतिसाद ग्राहकांकडून मार्केटमध्ये मिळाला नाही. विवो व्ही 7 प्लसमध्ये अॅन्ड्राईड 7.1 नॉगट ऑपरेटिंग सिस्टिमसह 5.99 इंचाचा स्क्रीन डिस्प्ले, 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरन मेमरी व 3225mAh इतक्या क्षमतेची बॅटरी आहे.
HTC U Ultra
एचटीसी कंपनीने यंदा यू अल्ट्रा स्मार्टफोन मार्केटमध्ये आणला. ज्यावेळी यू अल्ट्रा स्मार्टफोन लॉंच झाला, त्यावेळी मार्केटमध्ये स्थान टिकवून राहण्यास अपयशी ठरला. कोणत्याही एस्ट्रा ऑफर शिवाय 52,999 रुपये किंमतीला हा स्मार्टफोन लॉंच करण्यात आला होता. त्यानंतर मार्केटमध्ये यू अल्ट्राला ग्राहकांकडून कमी प्रतिसाद मिळाल्यानंतर कंपनीकडून या स्मार्टफोनमध्ये मोठी कपात करण्यात आली. ही कपात जवळपास 22,991 रुपये इतकी होती. तरी सुद्धा कमी प्रमाणात या स्मार्टफोनची विक्री झाली. यू अल्ट्रामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 821 प्रोसेसरसह 4 जीबी रॅम, 64 जीबी इंटरनल स्टोरेज, 3000mAh क्षमतेची बॅटरी आणि 12 अल्ट्रा पिक्सेलचा रिअर कॅमेरा देण्यात आला आहे.