Big Diwali Sale Flipkart 2021: आसूसच्या Laptop वर फ्लिपकार्ट मिळतोय जबरदस्त डिस्कॉउंट; किंमत 16990 रुपयांपासून पासून सुरु
By सिद्धेश जाधव | Published: October 27, 2021 06:32 PM2021-10-27T18:32:05+5:302021-10-27T18:32:12+5:30
Big Diwali Sale Flipkart 2021: 28 ऑक्टोबरपासून Asus Chromebook C214, C223, C423 आणि C523 वर हा डिस्काउंट मिळेल. फ्लिपकार्ट प्लस मेंबर्सना ही डील 24 तास आधीच मिळेल.
Asus India ने जुलै महिन्यात आपली क्रोमबुक लॅपटॉप रेंज सादर केली होती. आता फ्लिपकार्टवरील बिग दिवाली सेलमध्ये Asus Chromebook लॅपटॉपवर 3,000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट दिला जात आहे. 28 ऑक्टोबरपासून Asus Chromebook C214, C223, C423 आणि C523 वर हा डिस्काउंट मिळेल. फ्लिपकार्ट प्लस मेंबर्सना ही डील 24 तास आधीच मिळेल. तसेच SBI बँकेच्या क्रेडिट कार्डवर 10 टक्के इन्स्टंट डिस्काउंट देखील देण्यात येईल.
Asus Chromebook वरील डिस्काउंट
लॅपटॉप मॉडेल | मूळ किंमत | ऑफर मधील किंमत |
---|---|---|
Asus Chromebook Flip C214 | 24,999 | 21,990 |
Asus Chromebook C223 | 18,999 | 16,990 |
Asus Chromebook C423 (Touch) | 25,499 | 24,990 |
Asus Chromebook C423 (Non Touch) | 21,999 | 20990 |
Asus Chromebook C523 (Non Touch) | 22,499 | 21,490 |
Asus Chromebook Flip C214 चे स्पेसिफिकेशन
Asus Chromebook Flip C214 मध्ये 11.6-इंचाचा एचडी अँटी ग्लेयर डिस्प्ले देण्यात आला आहे. यात इंटेल ड्युअल कोर Celeron N4020 प्रोसेसर आणि इंटेल UHD ग्राफिक्स 600 देण्यात आला आहे. या लॅपटॉपमध्ये 4GB LPDDR4 रॅम आणि 64GB eMMC स्टोरेज मिळते. ही स्टोरेज मेमोरी कार्डच्या मदतीने 2TB पर्यंत वाढवता येते. कनेक्टिविटीसाठी या क्रोमबुकमध्ये एक USB 3.2 Gen 1 टाईप-ए, दोन USB 3.2 Gen 2 टाईप-सी, 3.5mm जॅक आणि एक माइक्रोएसडी कार्ड रीडर देण्यात आला आहे. यातील 50Whr ची बॅटरी 11 तासांचा बॅकअप देऊ शकते.
Asus Chromebook C423 चे स्पेसिफिकेशन
Asus Chromebook C423 मध्ये 14-इंचाचा एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. यात इंटेल Celeron N3350 प्रोसेसर आणि इंटेल ग्राफिक्स 500 मिळतो. हा क्रोमबुक 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. ही स्टोरेज 256GB पर्यंत वाढवता येते. या आसूस लॅपटॉपमध्ये दोन USB 3.2 Gen 1 टाईप-ए, दोन USB 3.2 Gen 1 टाईप-सी, 3.5mm ऑडियो जॅक आणि माइक्रोएसडी कार्ड रीडर, असे कनेक्टिव्हिटी ऑप्शन मिळतात. यात 38Whr ची बॅटरी देण्यात आली आहे.
Asus Chromebook C523 चे स्पेसिफिकेशन
Chromebook C523 मध्ये 15.6-इंचाचा एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा इंटेल Celeron N3350 ड्युअल कोर प्रोसेसर आणि इंटेल एचडी ग्राफिक्स 500 वर चालतो. सोबत 4GB रॅम आणि 64GB ची स्टोरेज मिळते. ही स्टोरेज 2TB पर्यंत वाढवता येईल. कनेक्टिव्हिटीसाठी या लॅपटॉपमध्ये दोन USB 3.2 Gen 1 टाईप-ए, दोन USB 3.2 Gen 1 टाईप-सी, 3.5mm ऑडियो जॅक आणि माइक्रोएसडी कार्ड रीडर असे ऑप्शन देण्यात आले आहेत. यात 38Whr ची बॅटरी देण्यात आली आहे.
Asus Chromebook C223 चे स्पेसिफिकेशन
Asus Chromebook C223 मध्ये 11.6-इंचाचा एचडी डिस्प्ले मिळतो. यात इंटेल Celeron N3350 ड्युअल कोर प्रोसेसर आणि इंटेल एचडी ग्राफिक्स 500 देण्यात आला आहे. हा लॅपटॉप 4GB रॅम आणि 32GB स्टोरेजसह बाजारात आला आहे. ही स्टोरेज 2TB पर्यंत वाढवता येते. यात दोन USB 3.2 Gen 1 टाईप-ए, दोन USB 3.2 Gen 1 टाईप-सी, 3.5mm ऑडियो जॅक आणि माइक्रोएसडी कार्ड रीडर असे कनेक्टिव्हिटी ऑप्शन देण्यात आले आहेत. यात 38Whr ची बॅटरी आहे.