Flipkart Sale: 11 हजारांच्या आत दमदार 5G Phone; शेवटचे दोन दिवस शिल्लक

By सिद्धेश जाधव | Published: March 15, 2022 04:01 PM2022-03-15T16:01:57+5:302022-03-16T13:24:22+5:30

Flipkart Big Saving Days Sale: फ्लिपकार्टच्या सेलमध्ये तुम्ही 11 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत 5G हँडसेट विकत घेऊ शकता.  

Flipkart Big Saving Days Sale Buy Poco M3 Pro 5G In Just 11,999 Rupees   | Flipkart Sale: 11 हजारांच्या आत दमदार 5G Phone; शेवटचे दोन दिवस शिल्लक

Flipkart Sale: 11 हजारांच्या आत दमदार 5G Phone; शेवटचे दोन दिवस शिल्लक

googlenewsNext

Flipkart Big Saving Days Sale: 12 मार्च ते 16 मार्च दरम्यान फ्लिपकार्टवर बिग सेव्हिंग डेज सेल सुरु आहे. या सेलमध्ये एक 5G स्मार्टफोन फक्त 11,999 रुपयांमध्ये मिळत आहे. आता तुम्ही विचार कराल कि नेहमीप्रमाणे ही एक एक्सचेंज ऑफर असेल जिथे जुना फोन दिल्यानंतरच एवढ्या कमी किंमतीत 5G स्मार्टफोन मिळेल. तर तसं नाही कोणत्याही एक्सचेंज ऑफरविना Poco M3 Pro 5G एवढ्या स्वस्तात मिळत आहे.  

Poco M3 Pro 5G वरील डिस्काउंट  

या फोनच्या 4GB RAM आणि 64GB स्टोरेज मॉडेलची किंमत 11,749 रुपये आहे, तर 6GB RAM आणि 128GB स्टोरेजसाठी 13,749 रुपये मोजावे लागतील. Flipkart Sale मध्ये या फोनवर 750 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट दिला जात आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त SBI क्रेडिट कार्डनं पेमेंट करावं लागेल. म्हणजे वरील सूट मिळून या फोनच्या बेस व्हेरिएंटची किंमत 10,999 रुपये होईल.  

POCO M3 Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स   

पोकोचा हा नवीन फोन पंच-होल डिस्प्लेसह लाँच झाला आहे. हा डिस्प्ले 20:9 अस्पेक्ट रेशियोला सपोर्ट करतो. तसेच या फुलएचडी+ एलसीडी डिस्प्लेचा आकार 6.5 इंच इतका आहे. हा फोन 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.  

पोकोनं या फोनसाठी मीडियाटेक डायमेंसिटी 700 चिपची निवड केली आहे, या प्रोसेसरला माली G57 GPU ची जोड देण्यात आली आहे. फोनमध्ये 64GB किंवा 128GB स्टोरेजसह 4GB किंवा 6GB RAM मिळेल. या पोको फोनमध्ये पावर बॅकअपसाठी 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी बॅटरी 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. फोन अँड्रॉइड 11 वर आधारित MIUI 12 वर चालतो.  

फोटोग्राफीसाठी POCO M3 Pro च्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये 48 मेगापिक्सलच्या मुख्य कॅमेरासोबत दोन 2MP चे कॅमेरे (मॅक्रो आणि डेप्थ) देण्यात आले आहात. फोनच्या समोरच्या बाजूस 8MP चा सेल्फी शुटर आहे. 

हे देखील वाचा:

Web Title: Flipkart Big Saving Days Sale Buy Poco M3 Pro 5G In Just 11,999 Rupees  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.