Flipkart Sale: 799 रुपयांमध्ये मिळवा Nokia चा 8200mAh बॅटरी असलेला टॅब; आज आहे शेवटचा दिवस
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 01:30 PM2022-03-31T13:30:43+5:302022-03-31T13:30:50+5:30
Flipkart Electronics Sale: आज 17,999 रुपयांचा Nokia चा टॅबलेट फक्त 799 रुपयांमध्ये विकत घेण्याची संधी मिळत आहे.
Flipkart वर 27 मार्चपासून Electronics Sale सुरु झाला आहे. या सेलचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे जर तुम्ही काही इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्तात विकत घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे फक्त काही तास शिल्लक राहिले आहेत. सेलमध्ये अनेक ऑफर्स उपलब्ध आहेत परंतु आज आम्ही तुमच्यासाठी Nokia च्या Tablet ची ऑफरची माहिती देणार आहोत. ज्यात 17,999 रुपयांचा हा टॅबलेट फक्त 799 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता.
Nokia T20 Tablet वरील ऑफर
ही ऑफर Nokia T20 Tablet वाय-फाय व्हेरिएंटवर उपलब्ध आहे. जो भारतात 17,999 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. परंतु फ्लिपकार्ट सेलमध्ये याची विक्री 15,499 रुपयांमध्ये केली जात आहे. हा टॅब विकत घेताना सिटी बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा उपयोग केला तर 1,500 रुपयांचा इंस्टेंट डिस्काउंट मिळेल. म्हणजे या टॅबची किंमत 13,999 रुपये होईल. परंतु आणखी 13,200 रुपयांची बचत करण्यासाठी तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन देखील एक्सचेंज करू शकता. म्हणजे हा टॅब फक्त 799 रुपयांमध्ये घरी आणता येईल.
Nokia T20 Tablet चे स्पेसिफिकेशन्स
Nokia T20 Tablet टॅबलेट 10.4-इंचाचा मोठा डिस्प्ले कंपनीनं दिला आहे. हा डिस्प्ले 2K रिजोल्यूशन आणि 400 नीट्स ब्राईटनेसला सपोर्ट करतो. या डिस्प्लेला टफ ग्लासची सुरक्षा देण्यात आली आहे. प्रोसेसिंगसाठी Nokia T20 Tablet मध्ये ऑक्टकोर Unisoc T610 SoC देण्यात आली आहे. त्याचबरोबर 4GB पर्यंत रॅम आणि 64GB पर्यंतची स्टोरेज मिळू शकते. हा एक अँड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो आणि पुढील दोन वर्षाचे अपडेट देखील कंपनी देणार आहे.
या टॅबलेटमध्ये 5-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच 8-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा एलईडी फ्लॅशसह देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी 4G LTE, Wi-Fi 802.11ac, ब्लूटूथ v5.0, USB Type-C आणि 3.5mm हेडफोन जॅक असे पर्याय मिळतात. त्याचबरोबर यात स्टिरियो स्पीकर देण्यात आले आहेत. Nokia T20 Tablet मध्ये कंपनीने 8200mAh ची दमदार बॅटरी दिली आहे. ही बॅटरी 15W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते आणि सिंगल चार्जमध्ये दिवसभर वापरता येईल.