अर्ध्या किंमतीत मिळतोय Vivo चा रंग बदलणारा 5G स्मार्टफोन; अशी आहे Flipkart ची जबरदस्त ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 16:00 IST2022-06-24T15:59:41+5:302022-06-24T16:00:22+5:30
Flipkart Electronics Sale 2022 मध्ये आज Vivo V23 5G स्मार्टफोन खूप कमी किंमतीत विकला जात आहे.

अर्ध्या किंमतीत मिळतोय Vivo चा रंग बदलणारा 5G स्मार्टफोन; अशी आहे Flipkart ची जबरदस्त ऑफर
Flipkart Electronics Sale 2022 सध्या सुरु असून हा सेल 26 जून पर्यंत सुरु राहणार आहे. नावाप्रमाणे अनेक इलेक्ट्रॉनिक्स डिवाइस या सेलमध्ये डिस्काउंटसह विकले जात आहे . यात Vivo V23 5G स्मार्टफोनचा देखील समावेश आहे. डिस्काउंट इतका आहे की या रंग बदलणाऱ्या स्मार्टफोनची किंमत अर्धी झाली आहे. त्यामुळे जर तुम्ही एखादा स्टायलिश स्मार्टफोन शोधत असाल तर या ऑफर्सचा फायदा घेऊ शकता.
Vivo V23 5G वरील ऑफर
Vivo V23 5G स्मार्टफोनचा 128GB व्हेरिएंट 34,990 रुपयांमध्ये भारतात लाँच करण्यात आला होता. परंतु या सेलमध्ये याची विक्री 5 हजार रुपयांच्या डिस्काउंटनंतर लेकिन फ्लिपकार्टवर 29,990 रुपयांमध्ये केली जात आहे. हा हँडसेट HDFC बँकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डनं विकत घेतल्यास 1,500 रुपयांची सूट मिळत नाही. Vivo V23 5G स्मार्टफोनवर 12,500 रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. म्हणजे तुम्ही तुमचा जुना फोन देऊन नवीन विवो फोन 15,990 रुपयांमध्ये घरी आणू शकता.
Vivo V23 5G चे स्पेसिफिकेशन्स
विवो वी23 5जी चा फ्रंट कॅमेरा सेगमेंट खूप खास आहे. फ्रंट पॅनलवर 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर तसेच 8 मेगापिक्सलचा सुपर वाईड अँगल सेल्फी कॅमेरा असलेला ड्युअल सेल्फी कॅमेरा सेटअप मिळतो. तर मागे 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो सेन्सरसह ट्रिपल रियर कॅमेरा आहे. तर पॉवर बॅकअपसाठी Vivo V23 मध्ये 4,200एमएएचची बॅटरी 44वॉट फ्लॅश चार्ज सपोर्टसह देण्यात आली आहे.
विवो वी23 5जी फोनमध्ये 6.44 इंचाचा अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. नॉच डिजाईनसह सादर करण्यात आलेला हा डिस्प्ले 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालतो. हा फोन अँड्रॉइड 12 आधारित फनटच ओएस 12 वर चालतो. यात मीडियाटेक डिमेनसिटी 920 चिपसेट आणि एआरएम माली जी68 जीपीयू देण्यात आला आहे. बेसिक कनेक्टिव्हिटीसह इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फिचर मिळतो.