Flipkart Diwali Sale: फ्लिपकार्ट फेस्टिव्ह धमाका; विविध प्रोडक्ट्सवर बंपर सूट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2018 04:41 PM2018-10-19T16:41:55+5:302018-10-19T16:42:14+5:30
Flipkart Festive Dhamaka Days sale : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर चार दिवसांसाठी सेल आणला आहे. हा सेल 24 ऑक्टोबरला सुरु होणार असून 27 ऑक्टोबरला संपणार आहे.
नवी दिल्ली : फ्लिपकार्ट कंपनी आपल्या ग्राहकांसाठी पुन्हा सेलचा धमाका घेऊन येणार आहे. गेल्या काही दिवसापूर्वी फ्लिपकार्ट कंपनीने ऑनलाइन मार्केटमध्ये बिग बिलियन डेज या नावाने सेल आणला होता. कंपनी आता पुन्हा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर चार दिवसांसाठी सेल आणला आहे. F
आपल्या ग्राहकांना खुश करण्यासाठी अनेक ऑफर्स फ्लिपकार्टकडून देण्यात येणार आहेत. आगामी सेलमध्ये स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर अॅक्सेसरीजवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट आणि सोप्या पद्धतीने पेमेंट करण्याचा ऑप्शन देण्यात येणार आहे. यासोबतच, सेलमध्ये ‘rush hours’ चे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये ग्राहकांना सुरुवातीच्या दोन तासांत म्हणजे रात्री 2 वाजेपर्यंत जादा डिस्काउंट मिळणार आहे. तसेच, ‘Dhamaka deals’ मध्ये दर आठ तासाला मोबाइल, लॅपटॉप आणि फॅशन कॅटगरीमधील वस्तूंवर नवीन ऑफर्स उपलब्ध होणार आहेत. त्यानंतर ‘price crash’ मध्ये ग्राहकांनी निवडलेल्या वस्तूंवर 10 टक्के जास्त डिस्काउंट मिळणार आहे. याचबरोबर, टीव्हीसह घरगुती वस्तूंच्या जवळपास 500 ब्रँड्सवर मोठ्या प्रमाणात सूट मिळणार आहे.
(अवघ्या 5 दिवसात अॅमेझॉन, फ्लिपकार्टकडून 15 हजार कोटींच्या सामानांची व्रिकी)
दरम्यान, अॅमेझॉन कंपनी सुद्धा बंपर सेल आणणार आहे. ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल संपल्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा अॅमेझॉन कंपनी बंपर सेल ऑनलाइन मार्केटमध्ये आणणार आहे. अॅमेझॉन कंपनीकडून या सेलला 'Wave 2' असे नाव दिले आहे. 'Wave 2' सेल 24 ऑक्टोबरला रात्री 12 वाजता सुरु होणार आहे. हा सेल चार दिवसांचा असून 28 ऑक्टोबरला रात्री 12 वाजता बंद होणार आहे. आधीचा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल 10 ते 15 ऑक्टोबरला आयोजित करण्यात आला होता.
(खूशखबर! अॅमेझॉन सेलचा पुन्हा धमाका, 90 टक्क्यांपर्यंत सूट)