35 हजार रुपयांचा 5G स्मार्टफोन मिळतोय फक्त 7 हजारांत; जाणून घ्या कसे?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 06:28 PM2022-10-12T18:28:47+5:302022-10-12T18:30:06+5:30

Diwali Dhamaka Offer : ऑफर तुम्हीच बघा आणि एवढ्या कमी किमतीत स्मार्टफोन कसा खरेदी करता येईल, हे समजून घ्या....

flipkart is offering heavy discount on this smartphone | 35 हजार रुपयांचा 5G स्मार्टफोन मिळतोय फक्त 7 हजारांत; जाणून घ्या कसे?

35 हजार रुपयांचा 5G स्मार्टफोन मिळतोय फक्त 7 हजारांत; जाणून घ्या कसे?

Next

नवी दिल्ली : दिवाळी सणानिमित्त अनेक ई-कॉमर्स साइट्सनी ग्राहकांना आकर्षित करण्याची अनेक ऑफर्स सुरू केल्या आहेत. फ्लिपकार्ट (Flipkart) देखील सेल आणला आहे. फ्लिपकार्टवर ग्राहक अतिशय वाजवी किमतीत शानदार प्रोडट्स खरेदी करू शकतात.

जर तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला फ्लिपकार्टवर स्मार्टफोन सेलवर खूप चांगली डील मिळू शकते. आज आम्ही तुम्हाला अशा स्मार्टफोनबद्दल सांगणार आहोत, जो तुम्ही अर्ध्याहून कमी किमतीत खरेदी करू शकता. त्यामुळे ही ऑफर तुम्हीच बघा आणि एवढ्या कमी किमतीत स्मार्टफोन कसा खरेदी करता येईल, हे समजून घ्या....
 
कोणता आहे स्मार्टफोन?
POCO F4 5G हा एकमेव स्मार्टफोन आहे, ज्यावर अशी जबरदस्त ऑफर दिली जात आहे आणि ग्राहकांना भरपूर बचत करण्याची संधी दिली जात आहे. या स्मार्टफोनची खरी किंमत 34999 रुपये आहे. मात्र, हा स्मार्टफोन 27 टक्के डिस्काउंटसह तो केवळ 25499 रुपयांना विकला जात आहे. दरम्यान, तुम्‍ही अतिशय फायदेशीर किंमतीत स्‍मार्टफोन खरेदी करू शकता आणि त्‍यामागील कारण हे आहे की, तुम्‍हाला यावर मजबूत एक्सचेंज बोनस दिला जात आहे.

ग्राहकांना या स्मार्टफोनवर 16900 रुपयांचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे. त्यानंतर ग्राहक जवळपास 8599 रुपयांच्या किमतीत खरेदी करू शकतात. एवढ्या किमतीत खरेदी केल्यानंतरही, जर तुम्हाला किंमत जास्त वाटत असेल, तर तुम्ही अॅडमिट कार्ड ऑफिसचा लाभ देखील घेऊ शकता, ज्यामध्ये तुम्हाला 1000 ते 2000 रुपयांचा फायदा मिळेल आणि ग्राहक हा स्मार्टफोन फक्त 7000 रुपयांमध्ये खरेदी करू शकतील. 

काय आहे खासियत?
जर खासियतबद्दल बोलायचे झाल्यास तुम्हाला या स्मार्टफोनमध्ये अनेक खास फीचर्स पाहायला मिळतील. ज्यामध्ये 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज तसेच 64 मेगापिक्सेल प्राइमरी रियर कॅमेरा सेटअप आणि स्नॅपड्रॅगन 800 प्रोसेसर आहे.
 

Web Title: flipkart is offering heavy discount on this smartphone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.