जुन्या मोबाईल्सना आता मिळणार तगडी किंमत; Flipkart नं लाँच केला Sell Back प्रोग्राम 

By सिद्धेश जाधव | Published: February 14, 2022 07:57 PM2022-02-14T19:57:31+5:302022-02-14T19:57:47+5:30

फ्लिपकार्टनं नवीन प्रोग्रामची सुरुवात स्मार्टफोनपासून केली आहे. लवकरच यात अन्य प्रोडक्ट्सचा समावेश केला जाईल.  

Flipkart Launches Sell Back Programme To Sell Used Smartphones News  | जुन्या मोबाईल्सना आता मिळणार तगडी किंमत; Flipkart नं लाँच केला Sell Back प्रोग्राम 

जुन्या मोबाईल्सना आता मिळणार तगडी किंमत; Flipkart नं लाँच केला Sell Back प्रोग्राम 

googlenewsNext

Flipkart नं नवीन Sell Back प्रोग्रामची सुरुवात केली आहे. यात ग्राहक आपले जुने वापरलेले स्मार्टफोन विकू शकतील. सध्या या प्रोग्राममध्ये फक्त स्मार्टफोन कॅटेगरीचा समावेश करण्यात आला आहे. परंतु लवकरच अन्य कॅटेगरीजचे प्रोडक्ट्स देखील समाविष्ट केले जातील. IDC च्या सर्वेनुसार 125 मिलियन जुन्या स्मार्टफोन्स पैकी सध्या फक्त 20 मिलियन पुन्हा विकले जातात.  

फ्लिपकार्टनं काही दिवसांपूर्वी Yaantra नावाच्या इलेक्ट्रॉनिक्स री-कॉमर्स फर्मचं अधिग्रहण केलं होता. ही फर्म जुने स्मार्टफोन्स विकत घेण्याचं काम करते. या फर्मच्या मदतीनं आता कंपनीनं या नवीन प्रोग्रामची सुरुवात केली आहे. तसेच भारतातील अनेक प्रमुख शहरांपैकी 1,500 पेक्षा जास्त पिनकोडवर ही सेवा लाईव्ह करण्यात आली आहे. जी Flipkart अ‍ॅपच्या तळाला असलेल्या ऑप्शन्समधून वापरता येईल.  

Flipkart Sell Back प्रोग्राम सर्व स्मार्टफोन्ससाठी उपलब्ध असेल, मग तो फोन फ्लिपकार्टवरून विकत घेतलेला असो वा नसो. स्मार्टफोन विकणाऱ्या युजरला तीन सोप्पे प्रश्न विचारले जातील, त्यानंतर ग्राहकांना त्यांच्या फोनची योग्य किंमत दाखवली जाईल. ग्राहकांनी कंफर्म केल्यानंतर फ्लिपकार्ट एग्जिक्यूटिव तो स्मार्टफोन 48 तासांमध्ये पिक-अप करतील. प्रोडक्ट व्हेरिफाय झाल्यानंतर ग्राहकांना ई-वाउचर मिळेल.  

हे देखील वाचा:

 

Web Title: Flipkart Launches Sell Back Programme To Sell Used Smartphones News 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.