पुन्हा धमाका करणार का POCO इंडिया? 30 सप्टेंबरला होऊ शकतो नवीन पोकोफोन
By सिद्धेश जाधव | Published: September 20, 2021 03:27 PM2021-09-20T15:27:42+5:302021-09-20T15:33:19+5:30
Upcoming Poco Phone: पोकोच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कंपनी भारतात आपला नवीन स्मार्टफोन लवकरच सादर करू शकते.
POCO भारतात आपला नवीन फोन लाँच करण्याची तयारी करत आहे. या महिन्याच्या शेवटी भारतात कंपनीचा नवीन स्मार्टफोन लाँच होणार आहे. याची माहिती Flipkart च्या माध्यमातून समोर आली आहे. लवकरच या शॉपिंग साईटवर Big Billion Days Sale ची सुरुवात केली जाणार आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन आणि इतर प्रोडक्ट अनेक प्रोडक्टवर डिस्काउंट आणि ऑफर दिल्या जातील. या सेलच्या आधी फ्लिपकार्टने लाँच होणाऱ्या स्मार्टफोन्सची एक यादी जाहीर केली आहे. या यादीत POCO च्या आगामी स्मार्टफोनचा देखील समावेश करण्यात आला आहे.
नवीन POCO फोनची लाँच डेट
फ्लिपकार्टच्या यादीनुसार पोको आपला नवीन स्मार्टफोन 30 सप्टेंबरला सादर कारणात आहे. पोको इंडियाने मात्र याविषयी कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. तसेच फक्त 10 दिवस उरले असतानाही कंपनीने कोणताही टीजर सोशल मीडियावर शेयर केला नाही आणि या फोनचे नाव देखील समोर आले नाही.
जुलैमध्ये लाँच झालेला POCO F3 GT
POCO F3 GT स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 480Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. या पोको स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 1200 SoC प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच गेम खेळताना फोन गरम होऊ नये म्हणून यात कूलिंग सिस्टम देण्यात आली आहे. हा फोन 8GB पर्यंत रॅम आणि 256 पर्यंतच्या स्टोरेजला सपोर्ट करतो.
POCO F3 GT मध्ये 64 मेगापिक्सलचा मुख्य रियर कॅमेरा मिळतो. त्याचबरोबर 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. या कॅमेरा सेटअपच्या चारही बाजूला असलेली अॅम्बिएन्ट लाईट नोटिफिकेशन इंडिकेटरचे काम करते. तसेच व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
पोकोच्या या गेमिंग फोनमध्ये 5,065mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा फक्त 15 मिनिटांत 50 टक्क्यांपर्यंत चार्ज केला जाऊ शकतो, असा दावा कंपनीने केला आहे. फोनच्या बॉक्समध्ये 67W चार्जर आणि एक एल-शेप चार्जिंग केबल देण्यात आली आहे.