190 रुपयांमध्ये मिळवा Vivo सर्वात पातळ 5G Smartphone; दिवसभर पुरेल यातील 5000mAh ची बॅटरी 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 01:07 PM2022-03-02T13:07:53+5:302022-03-02T13:08:09+5:30

Flipkart Sale: Vivo T1 5G स्मार्टफोन 50MP कॅमेरा आणि 5000mAh च्या बॅटरीसह सादर झाला आहे. हा फोन फ्लिपकार्टच्या सेलमध्ये स्वस्तात मिळत आहे.  

Flipkart Sale Buy Vivo T1 5g 128gb Storage Model Just Rs 190 | 190 रुपयांमध्ये मिळवा Vivo सर्वात पातळ 5G Smartphone; दिवसभर पुरेल यातील 5000mAh ची बॅटरी 

190 रुपयांमध्ये मिळवा Vivo सर्वात पातळ 5G Smartphone; दिवसभर पुरेल यातील 5000mAh ची बॅटरी 

googlenewsNext

Flipkart Sale: फ्लिपकार्ट लवकरच बिग बचत धमाल सेलची सुरुवात लवकरच होणार आहे. हा सेल 4 मार्चपासून 6 मार्चपर्यंत चालेल. सेल सुरु नसला म्हणून फ्लिपकार्टवरील ऑफर्स बंद झाल्या नाहीत. सध्या Vivo T1 5G जो कंपनीचा सर्वात स्लिम 5G Phone आहे खूप कम किंमतीत विकला जात आहे. थेट डिस्काउंट तर मिळत आहेच सोबत बँक आणि मोठी एक्सचेंज ऑफर देखील देण्यात आली आहे.  

Vivo T1 5G ची किंमत आणि ऑफर्स  

Vivo T1 5G च्या 128GB स्टोरेज मॉडेल भारतात 19,990 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. परंतु फ्लिपकार्टवर हा फोन 15,990 रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे. तसेच हा फोन विकत घेताना HDFC बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा वापर केल्यास 1000 रुपयांची बचत होईल. म्हणजे फोन 14,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  

कंपनीनं Vivo T1 5G वर 14,800 रुपयांची एक्सचेंज ऑफर सादर केली आहे. योग्य ब्रँड, स्पेक्स आणि अवस्थेत असलेला जुना फोन असल्यास हा डिस्काउंट मिळेल. पूर्ण एक्सचेंज डिस्काउंट मिळाल्यास Vivo T1 5G स्मार्टफोन फक्त 190 रुपयांमध्ये तुमचा होईल. तसेच 555 रुपयांच्या मासिक हप्त्यावर देखील हा फोन विकत घेऊ शकतो.  

Vivo T1 5G चे स्पेसिफिकेशन्स

Vivo T1 5G मध्ये 6.58-इंचाची फुल एचडी+ एलसीडी स्क्रीन देण्यात येईल. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. या फोनला क्वॉलकॉमच्या Snapdragon 695 चिपसेटची प्रोसेसिंग पावर देण्यात आली आहे. सोबत 8GB पर्यंत रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. हा फोन अँड्रॉइड 12 आधारित फनटच ओएसवर चालतो.  

फोटोग्राफीसाठी Vivo T1 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलची वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेन्सचा समावेश आहे. सिक्योरिटीसाठी साईड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. Vivo T1 मध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. 

हे देखील वाचा:

Web Title: Flipkart Sale Buy Vivo T1 5g 128gb Storage Model Just Rs 190

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.