500 रुपयांमध्ये मिळवा Samsung चा दमदार 5G Smartphone; पुन्हा मिळणार नाही Flipkart ची ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 03:51 PM2022-02-10T15:51:23+5:302022-02-10T15:51:31+5:30
Samsung चा 5G Smartphone फ्लिपकार्टच्या मोबाईल बोनांझा सेलमध्ये खूप स्वस्तात विकत घेता येत आहे. या फोनवर थेट 3000 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे.
Flipkart Mobiles Bonanza सेलमध्ये अनेक स्मार्टफोन्स डिस्काउंटसह उपलब्ध झाले आहेत. यात Samsung Galaxy F42 5G Phone चा देखील समावेश आहे. 64MP कॅमेरा, 8GB RAM आणि 5000mAh बॅटरी असलेला हा फोन 3000 रुपयांच्या सवलतीसह विकत घेता येईल. तसेच व्हॅलेंटाईन डे पर्यंत सुरु असलेल्या या सेलमध्ये Samsung चा 5G Smartphone फक्त 499 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
Samsung Galaxy F42 5G ची किंमत आणि ऑफर्स
या स्मार्टफोनच्या 128GB व्हेरिएंटची मूळ किंमत 23,999 रुपये आहे, परंतु सेलमध्ये यावर 3000 रुपयांची सूट दिली जात आहे. त्यामुळे हा फोन 20,999 रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे. तसेच डेबिट किंवा क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास 5 हजार रुपयांची सूट मिळून फोन 15,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. त्याचबरोबर 15,500 रुपयांच्या एक्सचेंज ऑफरचा वापर करून तुम्ही हा फोन फक्त 499 रुपयांमध्ये घरी आणू शकता.
Samsung Galaxy F42 5G चे स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy F42 5G स्मार्टफोनमध्ये 6.6 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. 1080 x 2408 पिक्सल रिजोल्यूशन आणि 90Hz रिफ्रेश रेट असलेला हा एक टीएफटी पॅनल आहे. या फोनमध्ये कंपनीने मीडियाटेकचा डायमेनसिटी 700 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा सॅमसंग फोन माली जी57 जीपीयूला सपोर्ट करतो. हा 5G फोन अँड्रॉइड 11 ओएससह वनयुआयवर चालतो.
या लेटेस्ट सॅमसंग फोनमध्ये 8GB पर्यंतचा RAM आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डने वाढवता येते. या स्मार्टफोनचा कॅमेरा सेगमेंट पाहता, याच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 64 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 5 मेगापिक्सलची अल्ट्रावाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर मिळतो. या फोनच्या फ्रंट पॅनलवर 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
Samsung Galaxy Wide5 5G मध्ये सिक्योरिटीसाठी साईड माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फिचर देखील देण्यात आले आहे. हा एक ड्युअल सिम फोन आहे जो बेसिक कनेक्टिविटी फीचर्सला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी या सॅमसंग फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 15वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
हे देखील वाचा:
- 27 दिवस चालेल या 5G Smartphone ची बॅटरी; 11GB RAM च्या ताकदीसह आला धमाकेदार Infinix Zero 5G
- 8GB पर्यंत RAM असलेल्या Samsung स्मार्टफोन्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट; अशी आहे Amazon ची ऑफर