Flipkart Super Value Week: 70 हजार रुपयांचा स्मार्टफोन 10, 999 रुपयांना !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2018 08:05 AM2018-06-19T08:05:44+5:302018-06-19T08:11:00+5:30

फ्लिपकार्टच्या सुपर व्हॅल्यू वीकमध्ये वस्तूंवर अनेक ऑफर आहेत. याचा फायदा अनेक ग्राहकांना होणार आहे.  सुपर व्हॅल्यू वीक 18 ते 24 जूनपर्यंत आहे. 

Flipkart Super Value Week: Smartphones worth 70 thousand rupees for 10, 999 rupees! | Flipkart Super Value Week: 70 हजार रुपयांचा स्मार्टफोन 10, 999 रुपयांना !

Flipkart Super Value Week: 70 हजार रुपयांचा स्मार्टफोन 10, 999 रुपयांना !

मुंबई : तुम्ही स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक खूशखबर आहे. ई-कॉमर्स वेबसाइट असलेल्या फ्लिपकार्टच्या सुपर व्हॅल्यू वीकला सुरुवात झाली आहे. फ्लिपकार्टच्या सुपर व्हॅल्यू वीकमध्ये वस्तूंवर अनेक ऑफर आहेत. याचा फायदा अनेक ग्राहकांना होणार आहे.  सुपर व्हॅल्यू वीक 18 ते 24 जूनपर्यंत आहे. 

सुपर व्हॅल्यू वीकमध्ये खासकरुन गुगल पिक्सल 2(128जीबी) स्मार्टफोनवर मोठी ऑफर आहे. गुगल पिक्सल 2 या स्मार्टफोनची किमत 70 हजार रुपये इतकी आहे. मात्र, या ऑफरमध्ये हा स्मार्टफोन 10,999 रुपयांना मिळू शकतो.  याशिवाय फक्त गुगल पिक्सलच्या स्मार्टफोनवरच नाही, तर आणखी काही स्मार्टफोन अशा सवलती ग्राहकांना मिळणार आहेत.  Moto X4 (4GB) हा स्मार्टफोन 22,999 रुपयांना आहे. मात्र, फ्लिपकार्टवर हा स्मार्टफोन 6,999 रुपयांना मिळणार आहे. यासाठी कंपनीने काही अटी सुद्धा ठेवल्या आहेत.  

गुगल पिक्सल 2 (128 जीबी) या स्मार्टफोनची बाजारात किंमत 70 हजार आहे. मात्र, फ्लिपकार्टवर 10, 999 रुपयांना खरेदी करु शकता. फ्लिपकार्ट बायबॅक व्हॅल्यू ऑफरवर हा स्मार्टफोन देणार आहे. बायबॅक म्हणजे ज्यावेळी तुम्ही हा स्मार्टफोन एक्सचेंज करणार त्यावेळी एक ठरविक किंमत ठरवलेली असते. या ऑफरमध्ये ग्राहकाने जर 8 महिन्यात हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर एक्सचेंज केला, तर ग्राहकाला बायबॅक व्हॅल्यू ऑफरमध्ये 42,000 रुपयांना परत घेतला जाणार आहे. याशिवाय, HDFC बॅंकेच्या कार्डवर कॅशबॅक देण्यात आली आहे. ही कॅशबॅक 8,000 रुपयांची आहे. मात्र, यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत. 


 

Web Title: Flipkart Super Value Week: Smartphones worth 70 thousand rupees for 10, 999 rupees!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.