ग्राहकांची उडाली झुंबड! 50 इंचाच्या Smart TV वर 25 हजारांची सूट; उरले फक्त काही तास 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 06:36 PM2022-04-19T18:36:25+5:302022-04-19T18:36:32+5:30

Flipkart TV Days सेलच्या शेवटच्या दिवशी शाओमीक्सच्या स्मार्ट टीव्हीवर मोठा डिस्काउंट दिला जात आहे.  

Flipkart TV Days Big Discount On Mi 50 Inch Smart Tv   | ग्राहकांची उडाली झुंबड! 50 इंचाच्या Smart TV वर 25 हजारांची सूट; उरले फक्त काही तास 

ग्राहकांची उडाली झुंबड! 50 इंचाच्या Smart TV वर 25 हजारांची सूट; उरले फक्त काही तास 

Next

15 एप्रिलपासून फ्लिपकार्टवर टीव्ही डेज विक्री सुरु आहे आणि आज या सेलचा शेवटचा दिवस आहे. गेले पाच दिवस Flipkart TV Days सेलमध्ये सॅमसंग, शाओमी, रियलमी, वनप्लस आणि कोडॅक सारख्या मोठ्या ब्रँड्सच्या टीव्हीवर डिस्काउंट, डील्स आणि ऑफर्स दिल्या जात आहेत. आज आम्ही तुमच्यासाठी साठी अशी एक ऑफर घेऊन आलो आहोत ज्यात तुम्ही 42 हजार रुपयांचा Mi चा 50-इंचाचा स्मार्ट टीव्ही फक्त 16 हजारांत घरी आणू शकता.  

Mi 4X 50 inch 4K LED Smart Android TV वरील ऑफर  

Mi 4X 50 inch 4K LED Smart Android TV भारतात 41,999 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. परंतु फ्लिपकार्टच्या सेलमध्ये याची विक्री 14 टक्के डिस्काउंटसह केली जात आहे. त्यामुळे हा मॉडेल 35,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. हा फक्त थेट डिस्काउंट आहे, बँक आणि एक्सचेंज ऑफरनंतर या टीव्हीची किंमत याच्याही अर्धी होते.  

या टीव्हीची खरेदी करताना फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डचा वरप करून तुम्ही 1,750 रुपयांची बचत करू शकता. तसेच आणखी 16,900 रुपये वाचवण्यासाठी तुम्ही तुमचा जुना टीव्ही एक्सचेंज करू शकता. योग्य मॉडेल जर तुम्ही दिला तर या ऑफरचा पुरेपूर फायदा घेता येईल. म्हणजे उर्वरित 16,349 रुपये देऊन तुम्ही हा टीव्ही घरी आणू शकता.  

Mi 4X 50 inch 4K LED Smart Android TV चे स्पेसिफिकेशन्स  

Mi 4X 50 inch 4K LED Smart Android TV मध्ये 50 इंचाचा 4K अल्ट्रा एचडी रिजोल्यूशन असलेला डिस्प्ले देण्यात आला आहे. यात Netflix, Disney+Hotstar आणि Youtube सारखे अनेक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म वापरता येतात. हा अँड्रॉइड टीव्ही असल्यामुळे गुगल असिस्टंट आणि क्रोमकास्ट फिचर बिल्ट-इन मिळतात. हा टीव्ही 20W चं साऊंड आऊटपुट देतो. स्मूद पिक्चर क्वॉलिटीसाठी 60Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे.  

Web Title: Flipkart TV Days Big Discount On Mi 50 Inch Smart Tv  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.