फ्लिपकार्टनं केली कमाल; फक्त 6 हजार रुपयांमध्ये Samsung ची शानदार Smart TV
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 16:17 IST2022-03-08T16:16:33+5:302022-03-08T16:17:11+5:30
Flipkart TV Upgrade Days Sale मध्ये 32-इंचाची Samsung स्मार्ट टीव्ही 21 हजार रुपयांच्या ऐवजी फक्त 6 हजार रुपयांमध्ये विकत घेता येईल.

फ्लिपकार्टनं केली कमाल; फक्त 6 हजार रुपयांमध्ये Samsung ची शानदार Smart TV
Flipkart Tv Upgrade Days Sale: फ्लिपकार्टवर सतत नवनवीन सेल्स सुरु असतात. सध्या या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर टीव्ही अपग्रेड डेज सेल सुरु आहे. हा सेल 7 मार्चपासून लाईव्ह झाला आहे. या सेलमध्ये सॅमसंगची 32-इंचाची स्मार्ट टीव्ही फक्त 5,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. यासाठी तुम्हाला थेट डिस्काउंटसह एक्सचेंज ऑफर्सचा वापर करावा लागेल.
किंमत आणि ऑफर्स
Samsung 32 inch HD Ready LED Smart TV ची मूळ किंमत 20,900 रुपये आहे. परंतु फ्लिपकार्ट सेलवर हा मॉडेल 18,499 रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे. यावर फेडरल बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा वापर करून तुम्ही 1,500 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. त्यामुळे या टीव्हीची किंमत 16,999 रुपये होईल. आणखीन बचत करण्यासाठी तुम्हाला जुनी टीव्ही एक्सचेंज करावी लागेल. फ्लिपकार्टवर 11 हजार रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर्स देण्यात आली आहे. या ऑफरचा पूर्ण फायदा मिळाल्यास सॅमसंगची ही टीव्ही फक्त 5,999 रुपयांमध्ये घरी आणता येईल.
Samsung 32 inch Smart LED TV चे स्पेसिफिकेशन्स
Samsung नं या स्मार्ट टीव्हीमध्ये Tizen ऑपरेटिंग सिस्टमचा वापर केला आहे. हा 32-इंचाचा टीव्ही 1,366 x 768 पिक्सल रिजोल्यूशन आणि एचडी रेडी डिस्प्लेसह येतो. यात तुम्हाला 60Hz चा रिफ्रेश रेट मिळतो, जो स्मूद पिक्चर क्वॉलिटीसाठी आवश्यक आहे. तसेच यात 20W चा आउटपुट देणारे स्पिकर्स देण्यात आले आहेत. यात अँड्रॉइड ओएस नसला तरी नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ आणि यूट्यूब असे ओटीटी अॅप्स मिळतात.
हे देखील वाचा:
- रेडमी-रियलमीची झोप उडणार; Samsung नं सादर केला सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन, पहिल्याच सेलमध्ये मोठा डिस्काउंट
- बंपर डिस्काउंट! यापेक्षा स्वस्तात पुन्हा मिळणार नाही iPhone 13; स्टॉक संपण्याआधीच करा बुक
- Samsung चा मोठा घोटाळा उघड; बेंचमार्किंग साईटनं बॅन केले 20 स्मार्टफोन, तुमचा फोन तर नाही ना यादीत?