Flipkartचा ग्राहकांना झटका; कॅश ऑन डिलिव्हरीसाठी द्यावा लागणार जास्तीचा शुल्क

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2022 05:42 PM2022-10-30T17:42:31+5:302022-10-30T17:59:05+5:30

ऑनलाईन शॉपिंक प्लॅटफॉर्म Flipkart ने कॅश ऑन डिलिव्हरीसाठी जास्तीचा शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे.

flipkart will now charge extra for cash on delivery orders | Flipkartचा ग्राहकांना झटका; कॅश ऑन डिलिव्हरीसाठी द्यावा लागणार जास्तीचा शुल्क

Flipkartचा ग्राहकांना झटका; कॅश ऑन डिलिव्हरीसाठी द्यावा लागणार जास्तीचा शुल्क

Next


लोकप्रिय शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट (Flipkart) वर खरेदी करणाऱ्यांची संख्या खूप आहे. फ्लिपकार्ट त्यांच्या बहुतांश उत्पादनांवर फ्री डिलिव्हरीसह विविध ऑफरही देते. तुम्हीही फ्लिपकार्टवरून खरेदी करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. फ्लिपकार्टवरून खरेदी करणे लवकरच महागणार असून कॅश ऑन डिलिव्हरीसाठी एक्स्ट्रा चार्ज भरावा लागणार आहे.

फ्लिपकार्ट वेबसाईटकडून मिळालेल्या माहितीनुसार, ग्राहकांनी 'कॅश ऑन डिलिव्हरी' पर्याय निवडल्यास, त्यांना आता अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल. म्हणजेच जर युजर्सने ऑनलाइन पेमेंट केले नाही, तर त्यांना थोडा जास्तीचा शुल्क द्यावा लागणार आहे. Flipkart ग्राहकांना सध्या काही विशिष्ट उत्पादनांवरच चार्ज द्यावा लागत आहे. 

तुम्ही ऑर्डर केलेल्या वस्तुचे मूल्य 500 रुपयांपेक्षा कमी असेल आणि ते Flipkart Plus वर सूचीबद्ध असेल, तर 40 रुपये डिलिव्हरी शुल्क भरावे लागेल. 500 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या ऑर्डरसाठी कोणतेही शुल्क लागणार नाही. दरम्यान, Flipkart Plus च्या मेंबर्सना कोणतेही शुल्क भरण्याची गरज नाही. 
 

Web Title: flipkart will now charge extra for cash on delivery orders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.