Flipkart Big Diwali Sale : फ्लिपकार्टवर पुन्हा फेस्टिव्ह धमाका; 80 टक्क्यांपर्यंत सूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2018 17:50 IST2018-10-28T17:49:50+5:302018-10-28T17:50:17+5:30
फ्लिपकार्ट कंपनी आपल्या ग्राहकांसाठी पुन्हा सेलचा धमाका घेऊन येणार आहे. गेल्या काही दिवसापूर्वी फ्लिपकार्ट कंपनीने ऑनलाइन मार्केटमध्ये बिग बिलियन डेज या नावाने सेल आणला होता.

Flipkart Big Diwali Sale : फ्लिपकार्टवर पुन्हा फेस्टिव्ह धमाका; 80 टक्क्यांपर्यंत सूट
नवी दिल्ली : फ्लिपकार्ट कंपनी आपल्या ग्राहकांसाठी पुन्हा सेलचा धमाका घेऊन येणार आहे. गेल्या काही दिवसापूर्वी फ्लिपकार्ट कंपनीने ऑनलाइन मार्केटमध्ये बिग बिलियन डेज या नावाने सेल आणला होता.
कंपनी आता पुन्हा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पाच दिवसांसाठी बिग दिवाळी सेल आणला आहे. हा सेल एक नोव्हेंबरला सुरु होणार आहे, तर पाच नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. आपल्या ग्राहकांना खुश करण्यासाठी अनेक ऑफर्स फ्लिपकार्टकडून देण्यात येणार आहेत.
असे सांगण्यात येत आहे की, या सेलमध्ये स्मार्टफोनपासून ते घरगुती वस्तूंवर जवळपास 80 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येणार आहे. तसेच, आगामी सेलमध्ये स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर अॅक्सेसरीजवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट आणि सोप्या पद्धतीने पेमेंट करण्याचा ऑप्शन देण्यात येणार आहे.
1) टॉप ब्रँडच्या मोबाइल आणि टॅब्लेटवर बंपर डिस्काउंट.
2) नोकिया 5.1 प्लस, ऑनर 9 एन, रेडमी 2 प्रो आणि Alcatel A3 10 यासारख्या स्मार्टफोनवर टॉप डिस्काउंट आहे.
ऑनर 9 एन स्मार्टफोनची किंमत 13, 999 रुपये आहे. मात्र, फ्लिपकार्टच्या सेलमध्ये हा स्मार्टफोन 9 हजार रुपयापर्यंत ग्राहकांना मिळणार आहे.
3) टीव्ही आणि घरगुती वस्तूंवर 70 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येणार आहे. तसेच, एक्सचेंज ऑफर आणि नो कॉस्ट ईएमआयची सुद्धा सुविधा आहे.
4) इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि अॅक्सेसरीजवर ग्राहकांना 80 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. तसेच एक्सचेंज ऑफर्ससोबत अॅक्सिडेंटल वॉरंटीची सुविधा मिळणार आहे.
5) निकॉन यासारख्या ब्रँड कॅमेऱ्यावर 15 हजारपर्यंत सूट मिळणार आहे. तर जेबीएल, सॅनहायजर कंपनीच्या हेडफोन्सवर 40 ते 70 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार.
6) फॅशन सेगमेंटमध्ये सुद्धा खरेदीवर ग्राहकांना भरपूर सूट मिळणार आहे. एक हजारपेक्षा जास्त टॉप ब्रँड्सच्या वस्तूंवर 50 ते 80 टक्के सूट आहे.