Truecaller वर असं वापरा कॉल रेकॉर्डिंग फीचर 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 03:53 PM2018-11-15T15:53:32+5:302018-11-15T16:20:17+5:30

स्मार्टफोन हा आता प्रत्येकाच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. स्मार्टफोन वापरणारे अनेक युजर्स Truecaller अॅपचा वापर करतात.

follow these steps to record call using truecaller call recording feature | Truecaller वर असं वापरा कॉल रेकॉर्डिंग फीचर 

Truecaller वर असं वापरा कॉल रेकॉर्डिंग फीचर 

Next
ठळक मुद्दे Truecaller नेही आपल्या युजर्ससाठी कॉल रेकॉर्डिंग हे नवं फीचर अॅड केलं आहे. कॉल रेकॉर्डिंग फीचर वापरण्यासाठी थोडासा खर्च करावा लागणार आहे. Truecaller आपल्या युजर्सना पहिले 14 दिवस हे फीचर मोफत देत आहे.

नवी दिल्ली - स्मार्टफोन हा आता प्रत्येकाच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. स्मार्टफोन वापरणारे अनेक युजर्स Truecaller अॅपचा वापर करतात. अनोळखी नंबरवरून येणारा कॉल कोणी केला आहे याची माहिती या अॅपच्या माध्यमातून मिळत असल्याने त्याचा खूप फायदा होतो. Truecaller नेही आपल्या युजर्ससाठी कॉल रेकॉर्डिंग हे नवं फीचर अॅड केलं आहे. 

सुरुवातीला केवळ अॅन्ड्रॉईड बीटा युजर्ससाठी ते लाँच करण्यात आलं होतं. मात्र आता Truecaller चं हे नवं फीचर सगळ्यांसाठी आहे. मात्र कॉल रेकॉर्डिंग फीचर वापरण्यासाठी थोडासा खर्च करावा लागणार आहे. Truecaller आपल्या युजर्सना पहिले 14 दिवस हे फीचर मोफत देत आहे. पण नंतर या फीचरचा वापर करायचा असल्यास Truecaller चं महिन्याचं अथवा वर्षाचं सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल.

 Truecaller वर असं करा कॉल रेकॉर्डींग फीचर अॅक्टीव्ह

- सर्वप्रथम गुगल प्ले स्टोरवर जाऊन Truecaller चं लेटेस्ट व्हर्जन डाऊनलोड करा. 

- अॅपवर असलेल्या तीन डॉटवर क्लिक करा.

- क्लिक केल्यावर कॉल रेकॉर्डिंगचा पर्याय मिळेल तो सिलेक्ट करा. 

- 'स्टार्ट फ्री ट्रायल' असं लिहिलेली एक नवीन विंडो ओपन होईल.

- अॅपद्वारे मागण्यात आलेल्या सर्व परमिशन्सवर OK करा. 

- या सर्व प्रक्रिया केल्यानंतर Truecaller अॅपमध्ये कॉल रेकॉर्डींग हे फीचर अॅक्टिव्ह होईल. 

फिचर अॅक्टिव्ह झाल्यानंतर फोनवर कॉल आल्यास अथवा दुसऱ्या व्यक्तीला कॉल केल्यास एक पॉपअप  स्क्रिन येईल. त्यावर OK करून तुम्ही कॉल रेकॉर्ड करू शकता.

Web Title: follow these steps to record call using truecaller call recording feature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.