iPhone बनवणाऱ्या कंपनीत बंपर भरती! 'या' महिन्यापासून भारतात मोबाईलची होणार निर्मिती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2023 09:24 AM2023-06-02T09:24:26+5:302023-06-02T09:25:04+5:30
Apple चे iPhone आता लवकरच भारतात तयार होणार आहेत.
Apple चे iPhone आता लवकरच भारतात तयार होणार आहेत. फॉक्सकॉन कंपनी एप्रिल २०२४ पासून कर्नाटकातील देवनहल्ली येथील प्रस्तावित प्लांटमध्ये आयफोन युनिट्सचे उत्पादन सुरू करणार असल्याची माहिती मंत्री एम. बी. पाटील यांनी दिली. कंपनी लवकरच सुरू करण्यासाठी राज्य सरकार ३१ जुलैपर्यंत जमीन कंपनीला सुपूर्द करणार आहे. जॉर्ज चू यांच्या नेतृत्वाखालील कंपनीच्या प्रतिनिधींची बैठक घेतल्यानंतर पाटील यांनी ही माहिती दिली. यात माहिती तंत्रज्ञान आणि जैवतंत्रज्ञान मंत्री प्रियांक खर्गे हे देखील उपस्थित होते.
गेम खेळणारेही होतील 'ऑफिसर', 6 महिन्यांत 10 लाख कमावण्याची ऑफर!
कंपनीला कर्मचार्यांमध्ये अपेक्षित कौशल्य सेट करण्यास सांगितले आहे, त्यानंतर पात्र उमेदवारांना रोजगारक्षम बनवण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम सुलभ करण्यासाठी पावले उचलली जातील, अशी माहिती मंत्री पाटील यांनी दिली.
तैवान-आधारित बहुराष्ट्रीय फॉक्सकॉनने कर्नाटक औद्योगिक क्षेत्र विकास मंडळाला (KIADB) जमिनीच्या किमतीच्या ३० टक्के (९० कोटी रुपये) आधीच दिले आहेत. तीन टप्प्यांत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे आणि दरवर्षी २० मिलियन युनिट्सचे उत्पादन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.