Fact Check : खरंच सरकार 10 कोटी युजर्संना Free Internet देणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 05:17 PM2021-06-01T17:17:59+5:302021-06-01T17:20:36+5:30
free internet plan fact check : व्हायरल मेसेजमध्ये असा दावा केला जात आहे की, केंद्र सरकार 10 कोटी युजर्संना मोफत इंटरनेट (Free internet plan) देणार आहे.
नवी दिल्ली : आजच्या काळात सोशल मीडिया (Social Media) माहितीचे एक मोठे माध्यम बनले आहे. परंतु या माध्यमाची विश्वासार्हता सतत कमी होत आहे, यामागील कारण चुकीचे आणि दिशाभूल करणारी माहिती आहे. असाच एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल मेसेजमध्ये असा दावा केला जात आहे की, केंद्र सरकार 10 कोटी युजर्संना मोफत इंटरनेट (Free internet plan) देणार आहे. (free internet plan by government for 100 million users know reality pib fact check)
या दाव्याची सत्यता?
यासंदर्भात सरकारने स्पष्टीकरण दिले आहे. पीआयबी फॅक्ट चेक (PIB Fact Check) टीमने हे स्पष्ट केले आहे की, हा फेक मेसेज (Fake Message) म्हणजेच सरकारची अशी कोणतीही योजना नाही की जी मोफत इंटरनेट (Free Internet Scheme) देण्यात येईल.
अशा बनावट वेबसाइटपासून सावध रहा
पीआयबीने ट्विटमध्ये म्हटले आहे की, "व्हॉट्सअॅप (WhatsApp) मेसेजमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, भारत सरकार 10 कोटी युजर्संना तीन महिन्यांकरिता विनामूल्य इंटरनेट सुविधा पुरवित आहे. PIB Fact Check: हा दावा आणि लिंक बनावट आहे. अशी कोणतीही घोषणा भारत सरकारने केलेली नाही. अशा बनावट वेबसाइटपासून सावध राहा."
धोखाधड़ी से सावधान!#WhatsApp मैसेज में दावा किया गया है कि भारत सरकार 3 महीने के लिए 100 मिलियन उपयोगकर्ताओं को मुफ्त इंटरनेट सुविधा प्रदान कर रही है।#PIBFactCheck: यह दावा व लिंक #फ़र्ज़ी है। भारत सरकार द्वारा ऐसी कोई घोषणा नहीं की गयी है। ऐसे फ़र्ज़ी वेबसाइट से सतर्क रहें। pic.twitter.com/08iUNUbEOM
— PIB Fact Check (@PIBFactCheck) June 1, 2021
तुमच्याजवळ असा मेसेज आला तर करू शकता फॅक्ट चेक
जर आपल्याला कोणताही अशा प्रकारचा मेसेज आला असेल तर तो पीआयबीकडे फॅक्ट चेकसाठी https://factcheck.pib.gov.in/ किंवा व्हॉट्अॅप नंबर +918799711259 किंवा ईमेलः pibfactcheck@gmail.com वर पाठवू शकता. यासंबंधी माहिती पीआयबीची वेबसाइट https://pib.gov.in वर देखील उपलब्ध आहे.
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! 'या' रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक बदलले, प्रवासापूर्वी यादी तपासा… https://t.co/LcPmpkN4Gr#IndianRailways#railway
— Lokmat (@MiLOKMAT) June 1, 2021