मोफत JioPhone! एकही रुपया न देता मिळवा 4G फोन; अशी आहे शानदार ऑफर  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 01:17 PM2022-04-15T13:17:37+5:302022-04-15T13:17:58+5:30

Free JioPhone: फिचर फोन्स युजर्सना लक्ष्य करत जियोनं आपला लोकप्रिय जियोफोन मोफत देण्यास सुरुवात केली आहे.

free jiophone with rs 1499 plan with 1 year of validity calling and data | मोफत JioPhone! एकही रुपया न देता मिळवा 4G फोन; अशी आहे शानदार ऑफर  

मोफत JioPhone! एकही रुपया न देता मिळवा 4G फोन; अशी आहे शानदार ऑफर  

Next

टच स्क्रीन स्मार्टफोन्स सर्वच लोकांना वापरता येत नाहीत. काहींच्या बजेटमध्ये देखील हे फोन्स बसत नाहीत. म्हणून फिचर फोन्सचा पर्याय निवडला जातो. तोच फोन मोफत मिळाला तर? आता जियोनं एक नवीन प्लॅन सादर केला आहे. ज्यात तुम्हाला कॉल्स आणि डेटा तर मिळतोच परंतु सोबत लोकप्रिय JioPhone मोफत दिला जात आहे.  

कंपनीनं 1,499 रुपयांचा एक प्लॅन सादर केला आहे. या प्लॅनसोबत तुम्हाला JioPhone फ्री दिला जात आहे आणि 1 वर्षाची वैधता दिली जाते. म्हणजे जर तुम्हाला फक्त कॉलिंगसाठी हवा असेल तर तुम्ही या प्लॅनची निवड करू शकता. ज्यात तुम्ही कोणत्याही नेटवर्कवर कॉल वर्षभर अमर्याद कॉल्स करता येतील. सोबत 24 जीबी डेटा आणि जियो अ‍ॅप्सचं सब्स्क्रिप्शन मोफत दिलं जाईल.  

कंपनीनं अजून एक प्लॅन सादर केला ज्याची किंमत 1,999 रुपये आहे. या प्लॅनची वैधता 2 वर्ष आहे. यात देखील तुम्हाला दोन वर्षांसाठी अनलिमिटेड कॉलिंग मिळेल. तसेच 48 जीबी डेटा आणि Jio अ‍ॅप्सचं मोफत सब्स्क्रिप्शन मिळेल. प्लॅनसह देखील JioPhone मोफत दिला जात आहे. 

Jio Phone चे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स  

जियो फोन हा एक 4G फीचर फोन आहे. यात 2.4-इंचाचा क्यूडब्ल्यूवीजीए डिस्प्ले देण्यात आला आहे. तासेच यात 1.2 गीगाहर्ट्ज स्प्रेडट्रम SPRD 9820A/QC8905 ड्युअल कोर प्रोसेसर, 512 एमबी रॅम आणि 4 जीबी स्टोरेज मिळते. या फिचर फोनमध्ये 2-MP रियर कॅमेरा आणि एक वीजीए फ्रंट कॅमेरा आहे. जियो फोनमध्ये 2000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. 4जी वीओएलटीई सह हा फोन ब्लूटूथ, वाय-फाय, एनएफसी, एफएम रेडियो, जीपीएस आणि यूएसबी 2.0 ला सपोर्ट करतो. 

Web Title: free jiophone with rs 1499 plan with 1 year of validity calling and data

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.