घरात फ्रिज आणि भिंतीमध्ये केवढी जागा असावी?; 'ही' चूक केल्यास लवकर खराब होईल कंप्रेसर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 04:50 PM2024-06-12T16:50:10+5:302024-06-12T16:55:53+5:30
काही जणांकडे फ्रिज हा भिंतीला चिटकून ठेवला जातो. पण हे असं करणं धोक्याचं आहे. फ्रिज आणि भिंतीमध्ये केवढी जागा असावी, नेमकं किती अंतर असावं हे जाणून घेऊया...
उन्हाळ्यात प्रत्येक इलेक्ट्रॉनिक उपकरणाला अतिउष्णतेचा फटका बसतोच. मग तो स्मार्टफोन, एसी, टीव्ही किंवा फ्रिज असो. कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणाला स्पर्श केल्यास उष्णतेच्या लाटेचा किती परिणाम झाला आहे हे दिसून येतं. उन्हाळ्यात बराच वेळ फ्रिज सुरू असल्याने तो सर्व बाजूंनी गरम होतो. त्यामुळेच काही वेळानंतर फ्रिज बंद ठेवावा, असे सांगितले जाते.
जर आपण तो २४ तास सुरू ठेवला तर त्याचा कंप्रेसर खूप वेगाने गरम होतो, ज्यामुळे कूलिंगवर खूप परिणाम होतो. कॉम्प्रेसर सुरक्षित ठेवण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. काही जणांकडे फ्रिज हा भिंतीला चिटकून ठेवला जातो. पण हे असं करणं धोक्याचं आहे. फ्रिज आणि भिंतीमध्ये केवढी जागा असावी, नेमकं किती अंतर असावं हे जाणून घेऊया...
फ्रिजच्या मागे पुरेशी जागा ठेवा
फ्रीज जुना असेल तर विजेचा वापर नक्कीच जास्त होतो. जुनं मॉडेल लवकर गरम होतं. अशा परिस्थितीत फ्रिजच्या मागे पुरेशी मोकळी जागा असणं आवश्यक आहे. फ्रीज भिंतीजवळ ठेवल्यास त्याच्या कंप्रेसरमध्ये हवा जाणार नाही. शिवाय, तो वेगाने गरम होऊ शकतो. अशा स्थितीत मोटारमध्ये आग लागण्याचा देखील मोठा धोका असतो.
जर तुमचा फ्रीज जुन्या मॉडेलचा असेल तर त्यात अमोनिया गॅस वापरला गेला आहे. हा गॅस अतिशय धोकादायक आहे आणि तो लीक होण्याचा धोकाही जास्त आहे.
फ्रिज भिंतीपासून नेमक्या किती अंतरावर ठेवावा?
फ्रिज भिंतीजवळ ठेवण्याची चूक कधीच करू नये. फ्रीज ठेवत असाल तर किमान ४ ते ६ इंच जागा या दोघांमध्ये असावी. जर तुमच्या कंप्रेसरमधून खूप मोठा आवाज येत असेल किंवा अजिबातच आवाज येत नसेल तर त्याकडे नक्कीच लक्ष देण्याची गरज आहे.