Digital Camera: लै भारी! Fujifilm ने आणला झटपट फोटो प्रिंट करणारा हायटेक डिजिटल कॅमेरा 

By सिद्धेश जाधव | Published: November 20, 2021 07:27 PM2021-11-20T19:27:43+5:302021-11-20T19:30:58+5:30

Digital Camera: Fujifilm आपला नवा डिजिटल कॅमेरा जागतिक बाजारात सादर केला आहे. या कॅमेऱ्याचे नाव Fujifilm Instax Mini Evo आहे.  

Fujifilm instax mini evo camera launch price sale features specifications  | Digital Camera: लै भारी! Fujifilm ने आणला झटपट फोटो प्रिंट करणारा हायटेक डिजिटल कॅमेरा 

Digital Camera: लै भारी! Fujifilm ने आणला झटपट फोटो प्रिंट करणारा हायटेक डिजिटल कॅमेरा 

googlenewsNext

Digital Camera: Fujifilm ने आपला नवीन डिजिटल कॅमेरा, Fujifilm Instax Mini Evo जागतिक बाजारात लॉन्‍च केला आहे. हा कॅमेरा जरी डिजिटल असला तरी कंपनीने जुन्या अ‍ॅनालॉग कॅमेऱ्याचा लूक दिला आहे. हा कॅमेरा काढलेले फोटो तात्काळ प्रिंट करू शकतो, ही याची खासियत आहे. यासाठी कॅमेऱ्यात एक डेडिकेटेड प्रिंट लिव्हर देखील देण्यात आला आहे. ज्याच्या मदतीने युजरला आवडलेला फोटो प्रिंट केला जाऊ शकतो.  

Fujifilm Instax Mini Evo चे स्पेसिफिकेशन्स 

Fujifilm Instax Mini Evo मध्ये व्हिनेट, सॉफ्ट फोकस, ब्लू, फिशआय, कलर शिफ्ट, लाईट लीक इत्यादी 10  लेन्स इफेक्ट मिळतात. तसेच विविड, पेल, कॅनवास, मोनोक्रोम, सेपिया, येलो इत्यादी 10 फ‍िल्‍म इफेक्‍ट्स देखील यात देण्यात आले आहेत. या कॅमेऱ्याने काढलेले फोटो तसेच युजरच्या स्मार्टफोनवरील फोटो देखील प्रिंट तर करता येतात. तसेच कॅमेऱ्यातील फोटो स्मार्टफोनवर प्रिंट अ‍ॅपने सेव्ह करता येतात.  

या कॅमेऱ्यात प्रायमरी कलर फिल्टर सह 1/5 इंचाचा CMOS देण्यात आला आहे. कॅमेऱ्याच्या लेन्सचा अपर्चर f/2.0 आहे आणि ही सिंगल ऑटोफोकसला सपोर्ट करते. शटर स्‍पीड 1/4 सेकंड ते 1/800 सेकंड (ऑटोमॅटिक स्विचिंग) पर्यंत आहे आणि ISO रेंज 100 ते 1600 दरम्यान आहे. 

या कॅमेऱ्यात 3 इंचाचा टीएफटी कलर एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. चार्जिंगसाठी मायक्रो-यूएसबी पोर्ट देण्यात आला आहे. हा कॅमेरा दोन ते तीन तासांत फुल चार्ज होतो. सिंगल चार्जमध्ये कॅमेरा 100 फोटो प्रिंट करू शकतो. कॅमेऱ्यात जवळपास 45 फोटो साठवता येतात, जवळपास 850 फोटजसाठी 1GB च्या microSD किंवा microSDHC मेमोरी कार्डचा वापर करता येईल. 

Fujifilm Instax Mini Evo ची किंमत 

Fujifilm Instax Mini Evo ची किंमत अमेरिकेत 199.95 डॉलर ठेवण्यात आली आहे. ही किंमत सुमारे 14,900 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते. हा कॅमेरा आता जरी सादर करण्यात आला असला तरी अमेरिकेत याची विक्री पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये सुरु होईल, त्याआधी 3 डिसेंबरपासून हा डिवाइस जापानमध्ये खरेदी करता येईल. 

Web Title: Fujifilm instax mini evo camera launch price sale features specifications 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.