ई-कॉमर्स आणि व्हॉइस मार्केटिंगचे भविष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2018 01:26 PM2018-06-11T13:26:43+5:302018-06-11T13:26:43+5:30

घरोघरी स्मार्टफोनप्रमाणे स्मार्ट स्पीकर्सही अवतरलेले आहेत. त्यामुळे कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर सर्वच ब्रँडसना करावा लागणार.

The future of e-commerce and voice marketing | ई-कॉमर्स आणि व्हॉइस मार्केटिंगचे भविष्य

ई-कॉमर्स आणि व्हॉइस मार्केटिंगचे भविष्य

Next

योगिन वोरा
बदलत्या जगामध्ये आपल्याला आभासी सहाय्यकांची म्हणजेच व्हर्चुअल मदतनिसांची सवय़ करुन घ्यायला हवी. या आभासी सहाय्यकांमुळे आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टी बदलून जातील. त्यामुळे आता वेगवेगळ्या ब्रँडस आणि मार्केटर्सनी आपल्या ग्राहकांशी संपर्क करण्याचे मार्गही बदलले आहेत. नवे तंत्रज्ञान या क्षेत्रामध्येही आलेले दिसून येते.

व्हॉइस असिस्टंटच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत आपली वस्तू पोहोचवण्याचे मार्ग खुले झाले आहेत. कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर आपल्या घरांमध्ये सुरु झालेला आहे. त्यामुळे व्हॉइस असिस्टंट हे जाहिरातीचे नवे मार्ग असल्याचे दिसून येते. सध्या अॅलेक्सा आणि गुगल होम करत असलेल्या जाहिराती केवळ आपल्याच संदर्भातील असल्याचे दिसून येते. ग्राहकाच्या तोंडी आदेशांचे पालन करु शकेल अशाच कौशल्यांना अॅलेक्साच्या तंत्रज्ञानात समाविष्ट केलेले आहे. मात्र भविष्यात तुम्हाला हवे ते निवडा अशा पद्धतीच्या जाहिराती याद्वारे करता येणे शक्य आहे.

वेगवेगळ्या आवाजांमधून म्हणजेच लोकांकडून तोंडी आज्ञा घेण्याची सोय कृत्रिम बुद्धीमत्तेच्या या यंत्रांमध्ये झाल्यास घरातील वेगवेगळे लोक याचा वापर करु शकतील. म्हणजेच वेगवेगळ्या उत्पादनांची, वेगवेगळ्या ब्रँडसच्या वस्तूंची जाहिरात करणे सोयीचे होईल. प्रत्येकाच्या आवडीनिवडीनुसार गरजा बदलतात त्यामुळे त्यांच्या आवडीनुसार मागणीही बदलत जाईल.

आज डिजिटल मार्केटमध्ये आपली वस्तू लोकांना आवडावी यासाठी विक्रेते जास्तीत जास्त प्रयत्न करताना दिसतात. आपली वस्तू ग्राहकाला पसंत पडावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. ग्राहकांना आपल्या वस्तूचा चांगला अनुभव यावा यासाठी ते धडपडत असतात. हकांशी संपर्क करण्यासाठी मेसेजिंग अॅप्सची मदत घेतली जाते. याची जागा आता कॉन्वर्सेशनल मार्केट घेत आहे. ई- कॉमर्सचे भविष्य आता व्हॉइस कमांड तंत्रज्ञानामध्ये आहे. इको आणि गुगल होम्सने याचा वापर केल्याचे दिसून येते. व्हॉइस कमांड तंत्रज्ञानाचा वापर अशा गुगल होम्स आणि इकोद्वारे वाढल्याचे दिसून येते. हे स्मार्ट स्पिकर घराघरांमध्ये पोहोचले आहेत. गेल्या 24 महिन्यांचा विचार केल्या आवाजावर आधारित आणि कृत्रिम तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेल्या या स्मार्ट स्पीकर्सची संख्या वाढत चालल्याचे दिसून येते. 2018 च्या उर्वरित सहा महिन्यांमध्ये अशीच वाटचाल सुरु राहिल अशी दिसते. स्मार्टवॉचेस, फोन, टॅब्लेट, लॅपटॉप्सप्रमाणेच आता आपण हे स्मार्ट स्पीकर्स वापरू शकू. सध्या 35 दशलक्ष लोक जगामध्ये स्मार्ट स्पीकर्सचा 30 दिवसांमधून किमान एकदातरी वापर करतात. 2020 पर्यंत स्मार्ट स्पीकरचे मार्केट 2 अब्ज डॉलर्सपर्यंत जाण्याची शक्यता आहे. हे उज्ज्वल भविष्य पाहातात ब्रँडसना आपल्या डिजिटल स्ट्रॅटेजीमध्ये याचा विचार आताच करावा लागणार.

ज्याप्रमाणए अॅपल अॅप स्टोअर बाजारात आले तेव्हा जी स्थिती होती तिच स्थिती आता आर्टिफिशयल इंटेलिजन्सच्या बाबतीत आहे. व्हॉइस कॉमर्स हे प्रत्येक माणसापर्यंत, कुटुंबापर्यंत पोहोचले आहे. मुळे व्हॉइस मार्केटिंग हेच भविष्य आहे.
 

Web Title: The future of e-commerce and voice marketing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.