यू-ट्यूबर्सचा गब्बर फंडा; व्हिडीओ टाकून प्रचंड पैसे मिळविता येतात, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2022 11:05 AM2022-03-13T11:05:32+5:302022-03-13T11:05:42+5:30

जगभरातल्या टॉप १० यू ट्यूबर्सच्या यादीत रायनचं नाव नवव्या स्थानी होतं.

Gabbar Fanda of U-Tubers; Find Out Where The High-Paying Freelance Copywriting Jobs Are | यू-ट्यूबर्सचा गब्बर फंडा; व्हिडीओ टाकून प्रचंड पैसे मिळविता येतात, जाणून घ्या

यू-ट्यूबर्सचा गब्बर फंडा; व्हिडीओ टाकून प्रचंड पैसे मिळविता येतात, जाणून घ्या

Next

- दुर्गेश सोनार

करीचा कंटाळा आलाय? दररोजचं तेच ते रुटीन अगदी नकोसं झालंय? कामाचं प्रेशर आणि ठरावीक मिळणारा पगार यातून खर्चाचा ताळमेळ बसवणं यामुळे जीव मेटाकुटीला आलाय? काहीतरी वेगळं, हटके करायचं आहे? असे प्रश्न तुम्हाला पडत असतील आणि आत्मिक समाधानासोबतच उत्पन्नाचा हमखास मार्ग तुम्ही शोधत असाल तर त्याचं उत्तर अगदी सोप्पंय... तुम्ही तुमच्यातल्या क्रिएटिविटीचा वापर करून अगदी सहज पैसे कमवू शकता. त्यासाठीचा सक्सेस पासवर्ड दिलाय यू ट्यूबने... तुम्ही तुमचं स्वतःचं यू ट्यूब चॅनल सुरू करू शकता आणि वर्षाकाठी लाखो रुपये देखील मिळवू शकता. तुम्ही म्हणाल, हे कसं शक्यंय? पण, हे शक्य होऊ शकतं. 

आता हेच पाहा... साधारण २०१७ सालची गोष्ट आहे. वय वर्षं अवघं सहा.. रायन नावाचा एक चिमुरडा... त्यानं त्याच्या आवडत्या खेळण्यांसोबत खेळता खेळता त्या खेळण्यांबद्दल त्याला काय वाटतं, हे त्याच्या बालसुलभ भाषेत सांगितलं, त्याचे व्हिडिओ त्याच्या पालकांनी केले आणि यू ट्यूबवर अपलोड केले. बघता बघता रायनचं हे यू ट्यूब चॅनल लोकप्रिय झालं आणि त्याला अवघ्या वर्षभरात मिळाले तब्बल ७० कोटी रुपये... रायन टॉयज् रिव्ह्यू या नावाचं त्याचं यू ट्यूब चॅनल आहे. रायन केवळ तीन साडे तीन वर्षांचा असताना त्याचं हे यू ट्यूब चॅनल सुरू झालं. एक कोटींपेक्षाही अधिक सबस्क्राबयर्स असलेल्या रायनच्या या चॅनलची दखल त्यावेळी फोर्ब्सनेही घेतली होती. 

जगभरातल्या टॉप १० यू ट्यूबर्सच्या यादीत रायनचं नाव नवव्या स्थानी होतं. आणखी एक हटके सक्सेस स्टोरी आहे तमिळनाडूतल्या शेतकऱ्यांच्या गटाची... त्यांनी शेतीच्या कामातून मिळालेल्या वेळातून व्हिलेज कुकिंग नावाचं यू ट्यूब चॅनल सुरू केलं. एप्रिल २०१८ मध्ये सुरू झालेल्या या यू ट्यूब चॅनलवर या शेतकऱ्यांनी ग्रामीण भागातल्या कृषी-खाद्य संस्कृतीवर आधारित व्हिडिओज् अपलोड केले. अल्पावधीतच हे चॅनल इतकं लोकप्रिय झालं की, त्याची भुरळ खुद्द काँग्रेस नेते राहुल गांधींनाही पडली. त्यांनी या शेतकऱ्यांची भेट तर घेतलीच पण त्यांच्या सोबत एक खास एपिसोडही केला होता. 

आता हे शेतकरी या यू ट्यूब चॅनलच्या माध्यमातून कोट्यधीश बनले आहेत. थोडक्यात काय, वेगळा विषय असेल, डोक्यात भन्नाट कल्पना असतील आणि त्या प्रत्यक्षात आणण्यासाठीची जिद्द असेल तर कुणीही सक्सेसफुल यू ट्यूबर होऊ शकतो. पण, आता चॅनल सुरू केलं आणि लगेेच पैसे मिळायला लागले, असं  नसतं. त्यासाठी सातत्य लागतं आणि कमालीचा संयमही असावा लागतो.   

यू ट्यूबर व्हायला काय हवं? 

स्वतःचं यू ट्यूब चॅनल सुरू करायचं असेल तर सर्वात आधी तुमच्या डोक्यात एकदम हटके विषय हवा. ज्या विषयाची तुम्हाला आवड आहे, अशा विषयातही तुम्ही व्हिडिओ करू शकता. हे व्हिडिओ करताना आणि ते सादर करताना तुमच्यात आत्मविश्वास हवा. मग तो विषय कोणताही असो... अगदी बालसंगोपन, रेसिपीज्, भाषा शिकवणं इथंपासून ते थेट अगदी किचकट अशा फायनान्शिअल प्लानिंगपर्यंत...  

नोकरी, धंदा सोडून यू ट्यूबर व्हावं का? 

अनेकांना असं वाटतं की आपण जे काम करतोय त्यात मजा नाही. नोकरी सोडावी आणि व्हावं फुलटाइम यू ट्यूबर... पण जरा थांबा. कारण तुम्ही एखादं यू ट्यूब चॅनल सुरू केलं आणि लोकांना ते आवडलं नाही, तुमचे व्हिडीओ व्हायरल झाले नाही तर? अशा वेळी नाराज होऊन चालणार नाही. त्यासाठी सुरुवातीला तुम्ही तुमचे आहे ते काम सुरू ठेवून फावल्या वेळात यू ट्यूबसाठी व्हिडिओ करू शकता. चॅनल सुरू केल्या केल्या लगेच पैसे मिळणार नाहीत.

कोणतं तांत्रिक ज्ञान असायला हवं?  

स्वतःचं यू ट्यूब चॅनल सुरू करण्याआधी यू ट्यूबच्या गाइडलाइन्स माहिती करून घ्या. यू ट्यूब क्रिएटर्स या अधिकृत चॅनलवर याबाबतचे सगळे तपशील तुम्हाला मिळू शकतात. यू ट्यूब क्रिएटर्सची अधिकृत लिंक तुम्हाला नेटवर सहज मिळू शकेल. 

कोणता सेटअप हवा?

यू ट्यूब चॅनल काढायला मोठा सेटअप लागत नाही. शूटिंग करण्यासाठी मोबाइल, व्हिडिओ एडिट करण्यासाठी एक लॅपटॉप आणि चांगला स्पीड असलेली इंटरनेट सुविधा. एवढ्यात तुमचं काम होतं. मात्र, या सोबतच तुम्ही कॅमेरा हाताळणे, व्हिडिओ एडिटिंग करणे, याबाबत देखील माहिती घेणं आवश्यक आहे. 

यू ट्यूबमुळे पैसे कसे मिळतात? 

यू ट्यूबचे काही नियम आहेत, ज्यांची पूर्तता केल्यावर तुमचं चॅनल मॉनिटाईझ अर्थात पैसे मिळण्यास पात्र होतं. त्यासाठी सर्वातआधी तुम्हाला तुमचं चॅनल गुगल ऍड सेन्स सोबत कनेक्ट करावं लागत. या माध्यमातूम तुमच्या व्हिडिओच्या व्ह्यूज आणि तुमच्या व्हिडिओवर दाखवल्या जाणाऱ्या जाहिराती यांचा हिशेब ठेवला जातो.  मात्र यू ट्यूब चॅनल तुम्ही आज तयार केलं आणि ऍड सेन्सला कनेक्ट केलं असं होत नाही. यासाठी देखील तुम्हाला काही गोष्टींची पूर्तता करणं गरजेचं आहे. 

यू ट्यूबर व्हायला काय हवं? 

स्वतःचं यू ट्यूब चॅनल सुरू करायचं असेल तर सर्वात आधी तुमच्या डोक्यात एकदम हटके विषय हवा. ज्या विषयाची तुम्हाला आवड आहे, अशा विषयातही तुम्ही व्हिडिओ करू शकता. हे व्हिडिओ करताना आणि ते सादर करताना तुमच्यात आत्मविश्वास हवा. मग तो विषय कोणताही असो... अगदी बालसंगोपन, रेसिपीज्, भाषा शिकवणं इथंपासून ते थेट अगदी किचकट अशा फायनान्शिअल प्लानिंगपर्यंत...

तुम्हाला एका वर्षात तुमच्या चॅनलवर १००० सबस्क्रायबर्स आणि ४००० तासांचा वॉच टाइम असणं गरजेचं आहे.  
सोबतच तुमच्या चॅनलवर 2 Step Verification करणं गरजेचं आहे. तुमच्या चॅनलवर कोणताही ऍक्टिव्ह कम्युनिटी स्ट्राइक नसला पाहिजे. जर तुमच्या चॅनलवर कम्युनिटी गाइडलाइन्स स्ट्राइक असेल तर तो स्ट्राइक एक्स्पायर होईपर्यंत थांबावं लागतं. या निकषांची पूर्तता झाल्यानंतरच तुम्ही मॉनिटायझेशन म्हणजेच यू ट्यूबपासून पैसे कमावण्यासाठी पात्र ठरता.  

यू ट्यूब तुमच्या चॅनलच्या कोणत्या गोष्टी तपासते ? 

  • तुमच्या चॅनलची थीम 
  • तुमचा सर्वात जास्त व्ह्यूज मिळालेला व्हिडिओ  
  • तुमचे नवीन अपलोड्स  
  • तुमच्या व्हिडिओचे टायटल्स, डिस्क्रिप्शन आणि टॅग्स  

ही पथ्ये पाळा  

  • चॅनलची भाषा चांगली असायला हवी, त्यात शिवीगाळ नको 
  • चॅनलच्या कंटेन्टमध्ये अश्लीलता, बीभत्सता, समाजविघातक कृती, व्यसनाधीनता, हिंसाचार या गोष्टी नसाव्यात.  रिपिटेटिव्ह कन्टेन्ट टाकू नका
  • तुम्ही एका विषयावर चार व्हिडिओ बनवू शकता, मात्र त्याचा कन्टेन्ट वेगळा असायला हवा 
  • कुणी इतरांनी बनवलेल्या व्हिडिओचा वापर करून तुमचे व्हिडिओ बनवू नका  
  • टेम्प्लेटेड व्हिडिओ वारंवार वापरू नका. म्हणजे एकाच प्रकारचं टेम्प्लेट सेट करून व्हिडिओ बनवू नका 
  • ऍड सेन्स अकाउंट तुम्ही एकदाच बनवू शकतात. ज्यासाठी तुमचं वय १८ वर्षांपेक्षा अधिक असायला हवं.

Web Title: Gabbar Fanda of U-Tubers; Find Out Where The High-Paying Freelance Copywriting Jobs Are

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.