18GB दमदार RAM सह Lenovo Legion Y90 गेमिंग फोन लाँच; इतकी आहे मोठया बॅटरीसह येणाऱ्या मोबाईलची किंमत
By सिद्धेश जाधव | Published: March 1, 2022 12:47 PM2022-03-01T12:47:52+5:302022-03-01T12:48:32+5:30
Lenovo Legion Y90 स्मार्टफोन 18GB RAM, 5600mAh बॅटरी, 144Hz रिफ्रेश रेट आणि 64MP कॅमेऱ्यासह लाँच झाला आहे.
Lenovo Legion Y90 गेमिंग स्मार्टफोन चीनमध्ये सादर केला आहे. कंपनी गेले काही दिवस हा गेमिंग स्मार्टफोन टीज करत होती. यात फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर मिळतो, सोबत कंपनीनं 18GB पर्यंत RAM देखील दिला आहे. चला जाणून घेऊया या भन्नाट स्मार्टफोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स.
Lenovo Legion Y90 Specifications
Lenovo च्या नवीन गेमिंग स्मार्टफोनमध्ये 6.9-इंचाचा Samsung E4 AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 144Hz रिफ्रेश रेट आणि 388ppi पिक्सल डेंसिटीला सपोर्ट करतो. हा फोन अँड्रॉइड अधरती ZUI 13 वर चालतो. या गेमिंग मशीनमध्ये Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर देण्यात आला आहे, सोबत 18GB पर्यंत RAM चा ऑप्शन मिळतो. दीर्घकाळ गेमिंगसती व्हेपर चेंबर कुलिंग देण्यात आली आहे.
Lenovo Legion Y90 च्या मागे ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 64 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आहे, त्याचबरोबर एक 13 मेगापिक्सलचा सेन्सर आहे. यात 16MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो. हँडसेटमध्ये 512GB पर्यंतचा स्टोरेज ऑप्शन मिळते. कनेक्टिविटीसाठी यात दोन USB टाइप-सी चार्जिंग पोर्ट मिळतात. यातील 5600mAh ची बॅटरी 68W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
Lenovo Legion Y90 Price
या गेमिंग स्मार्टफोनचे तीन व्हेरिएंट लाँच झाले आहेत. यातील 12GB RAM आणि 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 3999 युआन (जवळपास 47,800 रुपये) आहे. तर फोनच्या 16GB RAM आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 4299 युआन (जवळपास 51,400 रुपये) ठेवण्यात आली आहे. सर्वात मोठा 18GB RAM आणि 512GB स्टोरेज असलेला मॉडेल 4999 युआन (जवळपास 59,800 रुपये) मध्ये विकत घेता येईल.
हे देखील वाचा:
- 15 हजारांच्या आत फाडू फोन; 11GB RAM, 64MP कॅमेरा आणि 33W फास्ट चार्जिंगसह POCO M4 Pro ची भारतात एंट्री
- MWC 2022: अगदी छोटे डिटेल्सही दिसतील या 10.61 इंचाच्या 2K डिस्प्लेवर; दमदार बॅटरीसह Lenovo चा फाडू टॅब आला
- 32GB रॅम आणि 21 तास बॅटरी लाईफसह Samsung चे दोन दमदार लॅपटॉप Galaxy Book 2 Pro आणि Book 2 Pro 360 लाँच