महिन्यातून फक्त तीनदा चार्ज करा हा Smartwach; भन्नाट Garmin D2 Mach 1 ची जाणून घ्या किंमत
By सिद्धेश जाधव | Published: April 2, 2022 03:40 PM2022-04-02T15:40:18+5:302022-04-02T15:40:33+5:30
Garmin D2 Mach 1 स्मार्टवॉचमध्ये अनेक हटके फीचर्स देण्यात आले आहेत. त्याचबरोबर Heart Rate सेन्सर आणि SpO2 सेन्सर देखील मिळतात.
Garmin ही कंपनी आपल्या हटके स्मार्टवॉचसाठी ओळखली जाते. आता पुन्हा कंपनीनं आपल्या स्मार्टवॉच पोर्टफोलियोचा विस्तार केला आहे. कंपनीचं Garmin D2 Mach 1 नावाचं वॉच अमेरिकेत सादर करण्यात आलं आहे. यात हार्ट रेट सेन्सर, SpO2 सेन्सर आणि अन्य अनेक हेल्थ फीचर्स मिळतात परंतु 11 दिवसांचा बॅटरी बॅकअप ही याची सर्वात मोठी खासियत म्हणता येईल.
कंपनीचा दावा आहे की हे वॉच सिंगल चार्जवर 11 दिवस वापरता येईल. म्हणजे महिन्यातून फक्त तीनदा याला चार्जिंग करावी लागेल. हे स्मार्टवॉच पायलट आणि एविएशन प्रोफेशनल्सना लक्षात ठेऊन बनवण्यात आलं आहे. त्यामुळे यात जीपीएस आणि अन्य फीचर्ससह वेदर अलर्ट आणि होरिझॉन्टल सिच्युएशन इंडिकेटर असे फिचर मिळतात.
Garmin D2 Mach 1 चे फीचर्स
Garmin D2 Mach 1 मध्ये 1.3 इंचाचा अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, जो अल्वेज ऑन फिचरला सपोर्ट करतो. यात इन बिल्ट जीपीएस देण्यात आलं आहे. या स्मार्टवॉचमध्ये 32 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे, ज्यात तुम्ही म्यूजिक फाईल देखील स्टोर करू शकता, म्हणजे कोणत्याही कनेक्शनविना तुम्ही फक्त वॉचचा वापर करून तुमचं आवडीचं संगीत ऐकू शकता.
या गार्मिन स्मार्टवॉचमध्ये फ्लाईट टाइमिंग ट्रॅक करण्याचं फिचर देण्यात आलं आहे. तसेच फ्लाईट कधी येईल हे देखील अंदाजे सांगितलं जाऊ शकतं. या स्मार्टवॉचमध्ये युजर्सना SpO2 सेन्सर देण्यात आला आहे, जो रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण सांगतो. तर हार्ट रेट सेन्सर हृदयाच्या हालचालींवर लक्ष ठेवतं. यात तुमच्या रोजच्या फिटनेस अॅक्टिव्हिटी ट्रॅक केल्या जातात.
Garmin D2 Mach 1 ची किंमत
Garmin D2 Mach 1 ची किंमत 1199 डॉलर्स पासून सुरु होईल, ही किंमत सुमारे 90 हजार भारतीय रुपयांमध्ये रुपांतरीत होते. कंपनीनं या स्मार्टवॉचचे ऑक्सफोर्ड ब्राऊन लेदर बँड आणि विंटेज टायटेनियम ब्रेसलेट व्हेरिएंट सादर केले आहेत.