शरीरातील स्टॅमिना सांगणार Smartwatch; एकदा चार्ज करा आणि 16 दिवस वापरा, पाण्याखाली देखील चालणार
By सिद्धेश जाधव | Published: January 20, 2022 01:22 PM2022-01-20T13:22:45+5:302022-01-20T13:23:27+5:30
Garmin Epix Gen 2 Smartwatch: Garmin Epix Gen 2 मध्ये SpO2 सेन्सर, Heart Rate मॉनिटर आणि Stamina ट्रॅकर असे भन्नाट हेल्थ स्पेक्स देण्यात आले आहेत.
Garmin Epix Gen 2 स्मार्टवॉच काही भन्नाट फीचर्ससह लाँच करण्यात आली आहे. यात बेसिक हेल्थ फीचर्स तर आहेतच सोबत स्टॅमिना ट्रॅकर, रेस्पिरेशन (श्वसन) आणि स्लिप ट्रॅकिंग असे फिचर देखील मिळतात. हा स्मार्टवॉच 10ATM वॉटर प्रूफ रेटिंगसह सादर करण्यात आला आहे. त्यामुळे स्वीमर्स या वॉचचा वापर पोहताना देखील करू शकतात.
Garmin Epix Gen 2 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स
गार्मिन एपिक्स जेन 2 स्मार्टवॉचमध्ये 1.3-इंचाचा वर्तुळाकार टचस्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. हा 416x416 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करणारा अॅमोलेड डिस्प्ले आहे. जो ऑलवेज-ऑन डिस्प्लेला सपोर्ट करतो यात एंट्री लेव्हल मॉडेलमध्ये गोरिल्ला ग्लास डीएक्स प्रोटेक्शन तर बाकी दोन मॉडेल्स सॅफायर क्रिस्टलच्या सुरक्षेसह सादर करण्यात आले आहेत.
कनेक्टिव्हिटीसाठी यात ब्लूटूथ, वाय-फाय, जीपीएस आणि एएनटी+ असे ऑप्शन मिळतात. यात वॉच मध्ये 10ATM वॉटर रेजिस्टन्स सर्टिफिकेशन देण्यात आलं आहे. यात हार्ट रेट, रेस्पिरेशन, पल्स, ब्लड ऑक्सीजन सॅचुरेशन, स्लिप आणि स्ट्रेस ट्रॅकिंग असे हेल्थ मॉनिटरिंग फीचर्स मिळतात. शरीराचा स्टॅमिना सांगण्यासाठी यात बॉडी-बॅटरी फिचर मिळतं. तसेच अनेक स्पोर्ट्स देखील ट्रॅक करता येतात.
यात बॅरोमेट्रिक अल्टीमीटर, कंपास, जायरोस्कोप, अॅक्सेलेरोमीटर, थर्मामीटर आणि एंबियंट लाईट सेन्सर असे सेन्सर देण्यात आले आहेत. गार्मिन एपिक्स जेन 2 स्मार्टवॉच मोडमध्ये 16 दिवसांचा बॅटरी बॅकअप देऊ शकतो.
Garmin Epix Gen 2 ची किंमत
Garmin Epix Gen 2 स्मार्टवॉचच्या ब्लॅक टायटेनियम सॅफायर स्टील आणि व्हाईट टायटेनियम सॅफायर ऑप्शनमची किंमत 999.99 डॉलर (सुमारे 74,500 रुपये) आहे. तर एंट्री लेव्हल स्लेट स्टील मॉडेलची किंमत 899.99 डॉलर (सुमारे 67,000 रुपये) आहे.
हे देखील वाचा:
तुमच्यासाठीच बनलेत हे Smart TV; 15 हजारांच्या आत थिएटरचा अनुभव आणा घरात, फक्त काही दिवस सूट
OPPO च्या चाहत्यांसाठी गुड न्यूज! 12GB RAM, 65W Charging सह शक्तिशाली 5G Phone येतोय भेटीला