सिंगल चार्ज पुरतो 20 दिवस; हेल्थ रिपोर्ट देणारं स्मार्टवॉच लाँच, इतकी आहे किंमत  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2022 02:27 PM2022-06-02T14:27:58+5:302022-06-02T14:28:14+5:30

Garmin Forerunner 255 आणि Forerunner 955 स्मार्टवॉच जागतिक बाजारात लाँच झाले आहेत.  

Garmin Forerunner 255 And Forerunner 955 Smartwatches Launched   | सिंगल चार्ज पुरतो 20 दिवस; हेल्थ रिपोर्ट देणारं स्मार्टवॉच लाँच, इतकी आहे किंमत  

सिंगल चार्ज पुरतो 20 दिवस; हेल्थ रिपोर्ट देणारं स्मार्टवॉच लाँच, इतकी आहे किंमत  

Next

गार्मिननं जागतिक बाजारात Garmin Forerunner 255 नावाचं एंट्री लेव्हल तर Forerunner 955 नावाचं फ्लॅगशिप स्मार्टवॉच लाँच केलं आहे. हे दोन्ही वॉच गार्मिनच्या रनिंग स्मार्टवॉच पोर्टफोलियोमध्ये लाँच करण्यात आले आहेत. ज्यात मोठी बॅटरी, बिल्ट-इन जीपीएस, डिटेल्ड डेटा आणि एडॉप्टिव ट्रेनिंग प्लॅन सारखे फीचर्ससह येतात.  

Forerunner 955 सीरिज  

Forerunner 955 सिरीजमध्ये वर्कआउट आणि अ‍ॅक्टिव्हिटीसाठी जास्त डायनॅमिक डेटा दिला जातो. यात 260x260 पिक्सल रेजोल्यूशनसह 1.3 इंसाह्चा डिस्प्ले आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास डीएक्स प्रोटेक्शन देण्यात आलं आहे. तसेच रेस विजेट आणि 'मॉर्निंग रिपोर्ट' फीचर देखील मिळतात. या मॉडेलमध्ये 2,000 गाणी सेव्ह करता येतात. ब्लूटूथ, ANT+ आणि वाय-फायची कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे. हे स्मार्टवॉच 5ATM वॉटर रेजिस्टन्स रेटिंगसह आलं आहे. Forerunner 955 मध्ये 15 दिवस आणि सोलर व्हेरिएंटमध्ये 20 दिवस बॅटरी लाईफ मिळते. 

Garmin Forerunner 255 ची वैशिष्ट्ये 

Forerunner 255 मॉडेलमध्ये बिल्ट-इन ट्रायथलॉन फीचर देण्यात आलं आहे. तसेच यात 30 पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोड मिळतात. तसेच सजेस्टेड वर्कआउट, मॅराथॉन ट्रेनिंग प्लॅन आणि जिम एक्सरसाइज सजेशन देखील मिळतात. येईल रेस विजेट तुम्हाला रेस ट्रेनिंग टिप्स, पर्सनलाइज्ड सजेस्टेड वर्कआउट्सची माहिती देते. तर 'मॉर्निंग रिपोर्ट' मध्ये तुमचा दिवसभराचा डेटा एकत्र करून दाखवला जातो.  

Forerunner 255 मॉडेलमध्ये हार्ट रेट सेन्सर, स्लिप ट्रॅकर, हायड्रेशन ट्रॅकिंग आणि SpO2 मॉनिटरिंग मिळते. सर्व स्मार्टवॉच गार्मिन पे, वॉटर रेजिस्टन्स 5ATM रेटिंग आणि स्मार्ट नोटिफिकेशन सपोर्टसह येतात. म्युजिक मॉडेलवर 500 गाणी साठवून ठेवता येतात. कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ आणि एएनटी+ ऑप्शन मिळतात. सिंगल चार्जवर हे स्मार्टवॉच 14 दिवस वापरता येतं असा दावा करण्यात आला आहे.  

किंमत 

  • Garmin Forerunner 255 (46mm): $349.99 (जवळपास 27,100 रुपये)  
  • Garmin Forerunner 255s (41mm): $349.99 (जवळपास 27,100 रुपये)  
  • Garmin Forerunner 255 Music (46mm): $399.99 ( जवळपास 31,000 रुपये) 
  • Garmin Forerunner 255S Music (41mm): $399.99 ( जवळपास 31,000 रुपये)  
  • Garmin Forerunner 955: $499.99 (जवळपास 38,750 रुपये)  
  • Garmin Forerunner 955 Solar: $599.99 (जवळपास 46,500 रुपये) 

Web Title: Garmin Forerunner 255 And Forerunner 955 Smartwatches Launched  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.