गुगलचे बॅकअप टुल दाखल
By शेखर पाटील | Published: July 28, 2017 07:47 PM2017-07-28T19:47:54+5:302017-07-28T19:48:08+5:30
गुगलने आपले बॅकअप अँड सिंक हे नवीन टुल युजर्ससाठी सादर केले असून याच्या माध्यमातून संगणकातील डेटा सेव्ह करण्याची सुविधा देण्याची घोषणा केली आहे.
गुगलने आपले बॅकअप अँड सिंक हे नवीन टुल युजर्ससाठी सादर केले असून याच्या माध्यमातून संगणकातील डेटा सेव्ह करण्याची सुविधा देण्याची घोषणा केली आहे.
गुगलने आपल्या गुगल ड्राईव्ह या क्लाऊस स्टोअरेज सेवेचा विस्तार करत बॅकअप अँड सिंक हे टुच लाँच केले आहे. यावर आपण आपल्या संगणकातील विविध फाईल्स, छायाचित्रे, व्हिडीओज तसेच अन्य माहिती संग्रहीत करून ठेवू शकतो. हे टुल विंडोज आणि मॅक प्रणालीच्या युजर्ससाठी लाँच करण्यात येत आहे. याच्या माध्यमातून कुणीही आपल्या संगणकातील साठा यावर संग्रहीत करू शकतो. यातील सर्वात महत्वाची बाब म्हणजे अगदी संपूर्ण संगणकातील डेटा यावर सामावणे शक्य होणार आहे. ही सेवा संगणकासाठी अॅपच्या स्वरूपात सादर करण्यात आले आहे. हे अॅप गुगलच्या अंतर्गत कार्यरत असून मोफत अकाऊंटसाठी ते वापरता येणार नाही. अर्थात जी-सुट या सेवेवर प्रिमीयम अकाऊंट असणारे आपापल्या प्लॅननुसार बॅकअप अँड सिंकच्या माध्यमातून डेटा सेव्ह करू शकतील.